situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 18 April 2025 : जाणून घ्या कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 13 May 2025
---Advertisement---

मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग – आजचा दिवस – शुक्रवार. तारीख – १८.०५.२०२५ (Rashi Bhavishya 18 April 2025). शुभाशुभ विचार- ०८ नंतर चांगला.
आज विशेष- गुड फ्रायडे.
राहू काळ – सकाळी १०.३० ते १२.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र- ज्येष्ठा ०८.२१ पर्यंत नंतर मूळ.
चंद्र राशी – वृश्चिक ०८.२१ पर्यंत धनु.
—————————-
मेष- (शुभ रंग- लाल) Rashi Bhavishya 18 April 2025
आज तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. श्रद्धाळू मंडळींच्या सहवासात मनाची प्रसन्नता वाढेल. नित्य उपासनेतून एखाद्या दिव्य प्रचितीचा आनंद घ्याल.

वृषभ (शुभ रंग- राखाडी)
भागीदारीच्या व्यवसायात थोडेफार मतभेद होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता असलेली बरी. संध्याकाळी वाहन चालवताना गाणी गुणगुणू नका.

मिथुन (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज तुम्हाला काही सज्जनांचा सहवास लाभेल. चांगली वैचारिक देवाण-घेवाण होईल. तुमचे विचार प्रगल्भ होतील. पती-पत्नीमध्ये सुसंवाद राहील. छान दिवस.

कर्क ( शुभ रंग- पांढरा)
आज कष्टांच्या प्रमाणात मोबदला कमीच असला तरी तुमचा कामातील उत्साह दांडगा असेल. आज तुम्ही निस्वार्थीपणा ने इतरांच्या कामातही मदत कराल.

Shrimant Dagadusheth Ganesha: ‘दगडूशेठ’ गणपतीला ५० लाख मोग-यांचा पुष्पनैवेद्य

सिंह ( शुभ रंग- मरून) Rashi Bhavishya 18 April 2025
नोकरदारांना नेहमीचे काम प्रचंड कंटाळवणे वाटेल. एखाद्या नवीन विषयात गोडी निर्माण होईल. आज तुम्ही सहकुटुंब मौजमजेला प्राधान्य द्याल. मुलांचे हट्ट पुरवाल.

कन्या (शुभ रंग- निळा)
आज तुम्ही एखाद्या घरगुती सोहळ्यात हजेरी लावाल. बरेच दिवसापासून संपर्कात नसलेले काही आप्त-स्वकीय भेटल्याने जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल. आनंदी दिवस.

तूळ (शुभ रंग- आकाशी)
आज तुमचा जास्त वेळ घराबाहेरच जाईल. सामाजिक कार्यात मानसन्मान वाढेल. कुटुंबीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी कराल. मुले आज खेळातच जास्त रमतील.

वृश्चिक ( शुभ रंग- जांभळा)
राशीच्या धनस्थानातून होणारे चंद्र भ्रमण अनपेक्षित पैसा मिळवून देईल. तुमची भाग्योदयाकडे वाटचाल होईल. विरोधकांचा विरोध गोड बोलूनच थोपवून धरता येईल.

Lohagad Fort : मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी घेतला लोहगड किल्ल्याचा व शिवस्मारकाच्या कामाचा आढावा

धनु (शुभ रंग- डाळिंबी) Rashi Bhavishya 18 April 2025
आज तुमचे मन काहीसे चंचल राहील. घाई गर्दीत काही चुकीचे निर्णय घ्याल. व्यवसायात स्पर्धकांना कमजोर समजू नका. आज हातचे सोडून पळत्या मागे जाऊ नका.

मकर (शुभ रंग- जांभळा)
विविध मार्गाने आलेला पैसा विविध मार्गाने जाईल. चैनी वृत्तीस थोडा लगाम घालून आज तुम्ही भविष्य काळाच्या दृष्टीने एखादी योग्य गुंतवणूक करणे हिताचे राहील.

कुंभ ( शुभ रंग- गुलाबी)
पैशाअभावी रखडलेली कामे आज मार्गी लावू शकाल. योग्य वेळी घेतलेले योग्य निर्णय कामी येतील व धंद्यात यशाची चाहूल लागेल. मित्रांमध्ये मोठेपणा मिळेल.

मीन (शुभ रंग- क्रीम)
नोकरदारांना अधिकारी वर्गाचे दडपण जाणवेल. आज नाकासमोर चालणे हिताचे राहील. बेकायदेशीर कृत्ये अंगाशी येऊ शकतात. मित्रांच्या फार नादी लागू नका.

शुभम भवतु.

-जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

Follow Us On