मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग- शालिवाहन शके १९४७. विश्वावसुनाम संवत्सर. महिना: भाद्रपद कृष्ण पक्ष. तिथी – ११. वार – बुधवार. तारीख – १७.०९.२०२५ (Rashi Bhavishya 17 Sept 2025).
शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
आज विशेष- इंदिरा एकादशी.
राहू काळ – दुपारी १२.०० ते १.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र- पुनर्वसु ६.२६ पर्यंत नंतर पुष्य. चंद्र राशी – कर्क.
मेष – ( शुभ रंग – क्रीम) Rashi Bhavishya 17 Sept 2025
वास्तु व वाहन खरेदीच्या कामातील अडथळे दूर होतील. घरात सज्जनांची येजा राहील. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना परिश्रम वाढवावे लागणार आहेत.
वृषभ ( शुभ रंग- मरून)
महत्त्वाच्या कामासाठी तुमची भटकंती होणार आहे. प्रवासात झालेल्या नव्या ओळखीचे मैत्रीत रूपांतर होईल. सकारात्मकता वाढेल आशादायी दिवस.
मिथुन – ( शुभ रंग- पिस्ता)
आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने तुमची मनस्थिती ही उत्तम असेल. प्रभावी वक्तृत्वाने आज तुम्ही विरोधकांनाही आपलेसे कराल. शब्द जपून वापरा.
कर्क – ( शुभ रंग – हिरवा)
आज कुठेही आपलेच खरे करण्याचा तुमचा हट्ट असेल. इतरांचेही म्हणणे समजून घेणे हिताचे राहील. बेरोजगारांना घरापासून लांब रोजगार प्राप्ती होईल.
Vadgaon Maval: तरुणांनी व्यसनांपासून दूर रहावे- विक्रम देशमुख
सिंह – ( शुभ रंग – सोनेरी) Rashi Bhavishya 17 Sept 2025
घरात वडीलधाऱ्या मंडळीशी काही सौम्य मतभेद होऊ शकतात. खर्चाचे प्रमाण कमी करूनच आज जमाखर्चाचा तराजू समतोल ठेवता येईल.
कन्या – ( शुभ रंग- मोरपंखी)
आज राशीच्या लाभातील चंद्र तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्ती करेल. पैशा अभावी रखडलेली कामे सुरू करता येतील. संततीचे विवाह योग जुळून येतील.
तूळ ( शुभ रंग- डाळिंबी)
उद्योगधंद्यातील वाढत्या स्पर्धेने तुम्ही जरा त्रासलेले असाल. आज तुम्हाला कुटुंबीयांना वेळ देणे अवघड जाईल. वरिष्ठांनी दिलेली आश्वासने फार मनावर घेऊ नका.
वृश्चिक ( शुभ रंग – राखाडी)
आज तुमची आध्यात्मिक मार्गाकडे रुची वाढेल. काही नास्तिक मंडळीही आज मंदिराच्या रांगेत निमुटपणे उभी राहतील. संध्याकाळी एखादा सत्संग घडेल.
धनु (शुभ रंग- आकाशी) Rashi Bhavishya 17 Sept 2025
जे काम आपले नाही त्यात उगीच वेळ वाया घालवू नका. धाडसाची कामे तर आज टाळाच. नाकासमोर चालणे हिताचे राहील. जोडीदाराच्या चुका काढू नका.
मकर (शुभ रंग- गुलाबी)
अतिउत्साहात घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. अति आक्रमकता टाळावी. अडचणीच्या प्रसंगी तुम्हाला जोडीदार योग्य सल्ले देऊ शकेल.
कुंभ – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज खर्चाचे प्रमाण आवाक्याबाहेर जाणार आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होईल. प्रवासात आरोग्य बिघडेल काळजी घ्या.
मीन ( शुभ रंग- पांढरा)
नोकरदार मंडळी नोकरीत बदल करण्यासाठी उत्सुक असतील. सौंदर्यप्रसाधनांचे व्यवसाय आज तेजीत चालतील. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल.
शुभम भवतु!
– जयंत कुळकर्णी
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार
फोन 9689165424