मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – श्रावण – कृष्णपक्ष. तिथी – ०९, शके १९४७. वार – रविवार. तारीख – १७.०८.२०२५ (Rashi Bhavishya 17 August 2025)
शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – सामान्य दिवस.
राहू काळ – सायंकाळी ०४.३० ते ०६.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र – रोहिणी. चंद्र राशी – वृषभ.
मेष- (शुभ रंग- पिस्ता) Rashi Bhavishya 17 August 2025
आज काही सज्जन माणसे तुमच्या संपर्कात येतील. चांगली वैचारिक देवाण-घेवाण होईल. आज झालेल्या ओळखी भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहेत.
वृषभ (शुभ रंग- क्रीम)
आज तुमचा आत्मविश्वास दांडगा असेल. कार्यक्षेत्रात वाढीव जबाबदाऱ्या स्वतःहून स्वीकाराल. आज आपल्या तापट स्वभावावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
मिथुन (शुभ रंग – पांढरा)
आज काही साध्या कामात सुद्धा अनपेक्षित अडचणी येतील. घरातील थोर मंडळी आपलेच खरे करतील. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. खर्च वाढेल.
कर्क ( शुभ रंग- चंदेरी)
आज तुम्ही काही सहज घेतलेले निर्णय ही योग्य ठरतील. कमी श्रमात जास्त लाभ देणारा आजचा दिवस वेळेचे योग्य नियोजन करून सत्कारणी लावा.
Fraud : व्हॉट्सॲपवर खोटे मेसेज पाठवून 15 लाखांची फसवणूक
सिंह ( शुभ रंग- निळा) Rashi Bhavishya 17 August 2025
नोकरीच्या ठिकाणी अधिकारी वर्गाला काही अटीतटीचे प्रश्न सोडवावे लागतील. तरुणांच्या महत्त्वकांक्षा वाढतील. आज मित्रच तुम्हाला दगा देतील सतर्क रहा.
कन्या (शुभ रंग- मोतिया)
उद्योग धंद्यातील वाढत्या स्पर्धेमुळे आज व्यावसायिक मंडळी त्रस्त असतील. आज नास्तिक असला तरी सुद्धा देवाला एखाद्या नवस बोलण्याचा मोह होईल.
तूळ (शुभ रंग- हिरवा)
नोकरी व्यवसायात काही अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आज काही चुकीची माणसे संपर्कात येतील. झटपट लाभाचा मोह टाळावा.
वृश्चिक ( शुभ रंग- राखाडी)
समोर येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या प्रभावात असेल. आज सहकाऱ्यांवर ही आपली मते लादता येतील. घरात मात्र जोडीदाराचे मत विचारात घ्या.
धनु (शुभ रंग- मरून) Rashi Bhavishya 17 August 2025
नोकरीच्या शोधात असाल तर आज आलेली संधी सोडू नका. मामा मावशी कडून काही महत्त्वाचे समाचार येतील. आरोग्याच्या तक्रारीची वेळीच दखल घेणे हिताचे राहील.
मकर (शुभ रंग- सोनेरी)
आज शालेय उपयोगी वस्तूंचे व्यवसाय चांगले चालतील. उच्चशिक्षित तरुण मंडळी ध्येयप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करतील सहकुटुंब चैन कराल.
कुंभ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
समाजकार्य बाजूला ठेवून घरगुती कामात लक्ष घालणे हिताचे राहील. आज गृह सौख्याचा दिवस मुलांचे लाड आवरते घेऊन त्यांच्या शिस्तीला प्राधान्य द्यावे लागेल.
मीन ( शुभ रंग – मोरपंखी)
आपली कामे सोडून इतरांच्या भानगडीत लक्ष घालण्याचा तुम्हाला मोह होईल. आज घराबाहेर अति हुशार मंडळी भेटणार आहेत. कमीच बोललेले बरे.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424