मावळ ऑनलाईन – आजचे पंचांगमहिना – श्रावण – कृष्णपक्ष. तिथी – ०८ शके १९४७. (Rashi Bhavishya 16 August 2025) वार – शनिवार. तारीख – १६.०८.२०२५.शुभाशुभ विचार – कृत्तिका वर्ज्य.आज विशेष – गोपाळकाला, कालाष्टमी.राहू काळ – सकाळी ०९.०० ते १०.३०.दिशा शूल – पूर्वेस असेल.आज नक्षत्र – कृत्तिका.चंद्र राशी – मेष ११.४४ पर्यंत नंतर वृषभ.
—————————-
मेष- (शुभ रंग- पांढरा) Rashi Bhavishya 16 August 2025
राशीच्या धनस्थानातील चंद्रभ्रमण धंद्यातील आवक वाढवेल. पैशाअभावी रखडलेली काही कामे पूर्ण करता येतील. आज जरा वाणीवर लगाम गरजेचा राहील.
वृषभ (शुभ रंग- चंदेरी)
आज तुम्ही स्वतःचे लाड पुरवण्यासाठी सढळ हस्ते पैसा खर्च कराल. व्यक्तिमत्व विकासाकडे तुमचे लक्ष राहील. जोडीदाराला दिलेली वचनही पाळाल.
मिथुन (शुभ रंग – पिस्ता)
तुमचे खर्चा वरील नियंत्रण सुटल्याने जमाखर्चाचे गणित बिघडेल. नोकरदारांना काही जुन्या चुका निस्तराव्या लागतील. घरात आज थोरांशी वैचारिक मतभेद होतील.
कर्क ( शुभ रंग- क्रीम)
दिवस लाभाचा असून आज सगळी महत्वाची कामे सुरळीत पार पडणार आहेत. एखाद्या नवीन उद्योगाचा श्री गणेशा करण्यासाठी आज उत्तम दिवस आहे.
सिंह ( शुभ रंग- मोठ्या)
नोकरदारांवर कामाचा ताण प्रचंड वाढणार आहे. घरगुती कामे दुर्लक्षित झाल्याने आज कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल. मित्रांना दुरूनच राम राम केलेला बरा.
कन्या (शुभ रंग- निळा)
नोकरदार आज नवीन नोकरीच्या शोधात असतील. अधिकारी वर्गाला काही अटीतटीचे प्रसंग हाताळावे लागतील. आजी आजोबा आज नातवंडात रमतील.
तूळ (शुभ रंग- राखाडी)
आज फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. आपल्या मर्यादा ओळखणे गरजेचे राहील. घरात जोडीदाराशी सामंजस्याचे धोरण ठेवणे हिताचे राहील.
वृश्चिक ( शुभ रंग- हिरवा)
कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल. विरोधकही आज नमते घेतील. मुले अज्ञाधारकपणे वागतील. वैवाहिक जीवनात तिसऱ्याचा विषय काढू नका.
धनु (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
काही रखडलेली येणी असतील तर ती मागितल्याने वसूल होऊ शकतील. खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचे आहे कारण आज पोट बिघडण्याची शक्यता आहे.
मकर (शुभ रंग- मरून)
आज तुम्ही आनंदी व उत्साही असाल. बऱ्याच दिवसानंतर काही जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल. रसिक मंडळी काम बाजूला ठेवून मौजमजेला प्राधान्य देतील.
कुंभ ( शुभ रंग- गुलाबी)
शेतीवाडी जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार आज तुमच्या अपेक्षेनुसार होतील. वाहन खरेदीसाठी कर्ज मंजुरी होऊ शकते. तरुणांनी प्रेम प्रकरणांपासून दूरच राहावे.
मीन ( शुभ रंग – सोनेरी)
आज तुमचा बराच वेळ घराबाहेर जाईल. कामानिमित्त झालेले प्रवास कार्य साधक होतील. शेजारी घरोबा वाढेल. घरमालक व भाडेकरू यांच्यात किरकोळ मतभेद संभवतात.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424