मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. ज्येष्ठ कृष्ण ४ (१५.५२ प), शके १९४७. वार – रविवार. तारीख – १५.०६.२०२५ (Rashi Bhavishya 15 June 2025). शुभाशुभ विचार – १२ प. चांगला दिवस.आज विशेष – सामान्य दिवस.राहू काळ – संध्याकाळी ४.३० ते ०६.००.दिशा शूल – पश्चिमेस असेल.आज नक्षत्र – श्रवण.चंद्र राशी – मकर.
—————————-
मेष- (शुभ रंग- निळा) Rashi Bhavishya 15 June 2025
नोकरीच्या ठिकाणी काही वाढीव जबाबदारी स्वीकाराव्या लागतील. आज फक्त आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्याल. मित्र आज तुम्हाला खोटी आश्वासने देतील.
वृषभ (शुभ रंग- पिस्ता)
नोकरदारांवर वरिष्ठांचे दडपण राहील. आज शासकीय नियम काटेकोरपणे पाळावे लागतील. ध्येयपूर्तीसाठी कामाचे तास वाढवावे लागतील. आज दानधर्म कराल.
मिथुन (शुभ रंग – क्रीम)
उद्योगधंद्याच्या दृष्टीने आज विरोधी दिवस असून नोकरदारांना साहेबांचे मूड सांभाळावे लागतील. आज हातचे सोडून पळत्या मागे धावू नका.
कर्क ( शुभ रंग- सोनेरी)
आज फक्त आपल्या भल्याचा विचार करा. भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊच नका. आज जोडीदाराच्या चुका काढण्याची चूक करू नका.
सिंह ( शुभ रंग- गुलाबी) Rashi Bhavishya 15 June 2025
आज अति आक्रमकता नुकसानाला कारणीभूत होईल. महत्त्वाच्या प्रश्नात जोडीदाराचे मत अवश्य घ्या. हौस मौज करताना कायद्याचे बंधन पाळा.
कन्या (शुभ रंग- जांभळा)
तरुणांच्यात चैनी व विलासी वृत्ती बळावेल. मॉलमधील ब्रँडेड वस्तू गृहिणींना आकर्षित करतील. कलावंत आज मिळालेल्या संधीचे सोने करतील.
तूळ (शुभ रंग- मोतिया)
मुले आज मान मोडून अभ्यास करतील. घरात सज्जनांची उठबस राहील. गृहिणींना लघु उद्योगातून चांगली मिळकत होईल. आज आईचे मन मोडू नका.
वृश्चिक ( शुभ रंग- केशरी)
आज राशीच्या पराक्रम स्थानातून चंद्र भ्रमण होत असताना चर्चेपेक्षा कृतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. आज लहान भावाला मदत कराल. घराबाहेर वाद टाळा.
धनु (शुभ रंग- स्ट्रॉबेरी) Rashi Bhavishya 15 June 2025
विविध मार्गाने पैसा येईल. आज आपले आवडते छंद जपण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. विवाह विषयक बोलणी आज होकारार्थी पार पडतील.
मकर (शुभ रंग- चंदेरी)
पूर्वी केलेली गुंतवणूक चांगला लाभ देईल. आज एखादी हरवलेली वस्तू गवसेल. मुले आज्ञेत वागतील. आज वैवाहिक जीवनात तू तिथे मी.
कुंभ ( शुभ रंग- आकाशी)
खर्च कितीही वाढला तरी पैसा कमी पडणार नाही. तुमची मोठ्या लोकांमधील उठबस फायदेशीर राहील. कलाकारांचा परदेशात नावलौकिक होईल.
मीन ( शुभ रंग – राखाडी)
कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध निर्माण होतील. उपवरांना सुयोग्य स्थळे सांगून येतील. चैनी व विलासी वृत्ती वाढेल. आवडते छंद जपण्यासाठी आज वेळ काढाल.
शुभम भवतु!
-जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424