मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – श्रावण – कृष्णपक्ष. तिथी – ०६, शके १९४७. वार – गुरुवार. तारीख – १४.०८.२०२५ (Rashi Bhavishya 14 August 2025). शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.आज विशेष – पतेती. राहू काळ – दुपारी ०१.३० ते ०३.००. दिशा शूल – दक्षिणेस असेल. आज नक्षत्र – रेवती ०९.०६ पर्यंत नंतर अश्विनी. चंद्र राशी – मीन ०९.०६ पर्यंत नंतर मेष.
—————————-
मेष- (शुभ रंग- चंदेरी) Rashi Bhavishya 14 August 2025
आज तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल. व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्याल. एखाद्या नवीन विषयात तुम्हाला गोडी वाटेल. आज जोडीदाराचे हट्ट पुरवाल.
वृषभ (शुभ रंग- पिस्ता)
राशीच्या वयातील चंद्र तुम्हाला काही दूरवरचे प्रवास घडवेल. प्रवासात आरोग्य सांभाळा. आज काही अनावश्यक खर्च कराल. दूरची नाती संपर्कात येतील.
मिथुन (शुभ रंग – भगवा)
आज समाजातील प्रतिष्ठित लोकात तुमची उठबस होईल. कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा हौशीने पुरवाल. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा लाभ होण्याची शक्यता आहे.
कर्क ( शुभ रंग- निळा)
ध्येय साध्य करण्यासाठी अथक प्रयत्नांशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. आज तुम्ही आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या. अधिकाराचा गैरवापर नको.
Dighi Crime News: दिघी येथे दुकानातील वादातून तरुणाची हत्या, दोघे ताब्यात
सिंह ( शुभ रंग- राखाडी) Rashi Bhavishya 14 August 2025
सर्व कामे सुरळीत पार पडतील. एखाद्या नवीनच विषयात तुम्ही सखोल ज्ञान मिळवाल. गूढ शास्त्रांबद्दल तुमची उत्सुकता वाढेल. आज दानधर्म कराल.
कन्या (शुभ रंग- आकाशी)
राशीच्या अष्टमातून चंद्रभ्रमण होत असताना कोणतेही धाडस टाळणे हिताचे. जे काही चालले ते बरं चाललंय असं समजा. जोडीदाराच्या मताने घ्या.
तूळ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज काही नवीन नाती जुळतील. व्यवसायात जाहिरातीचे स्वरूप बदलावे लागेल. काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल. आज काही पेच प्रसंग यशस्वीरित्या सोडवाल.
वृश्चिक ( शुभ रंग- मोरपंखी)
आजचा दिवस कष्टांचा आहे. सहज काही मिळेल या भ्रमात राहू नका. आज तुमचे मनोबलही कमीच असेल महत्त्वाचे निर्णय घ्यायला उशीर करू नका.
धनु (शुभ रंग- सोनेरी) Rashi Bhavishya 14 August 2025
कला क्रीडा क्षेत्रात असणाऱ्यांना उत्तम संधी चालून येतील. कार्यक्षेत्रातील काही सुखद घटना तुमचा आत्मविश्वास वाढवतील. गृहिणी पार्लर साठी वेळ काढतील.
मकर (शुभ रंग- गुलाबी)
आज काही घरगुती समस्यांवर लक्ष देणे तुम्हाला गरजेचे वाटेल. गृहिणी वेळात वेळ काढून मुलांच्या पुस्तकात डोकावतील. आज वाहनाची काळजी घ्यावी लागेल.
कुंभ ( शुभ रंग- डाळिंबी)
आज घर खरेदी किंवा वाहन खरेदीचे व्यवहार टाळावेत. गोडबोल्या मंडळींकडून आलेल्या प्रलोभनांना बळी पडू नका. जनांचे ऐकून मनाचेच करा.
मीन ( शुभ रंग – जांभळा)
आज तुम्ही अत्यंत आनंदी व उत्साही असाल. राशीच्या धनातील चंद्र आर्थिक बाजू भक्कम ठेवेल. बरेच दिवसांनी एखादी प्रिय व्यक्ती तुमच्या संपर्कात येईल.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424