मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – भाद्रपद – कृष्णपक्ष. तिथी – ०४. शके १९४७. वार – गुरुवार. तारीख – ११.०९.२०२५ (Rashi Bhavishya 11 Sept 2025)
शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – भरणी श्राद्ध, पंचमी श्राद्ध.
राहू काळ – दुपारी ०१.३० ते ३.००.
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आज नक्षत्र – अश्विनी १३.५८ पर्यंत नंतर भरणी. चंद्र राशी – मेष.
मेष- (शुभ रंग- स्ट्रॉबेरी) Rashi Bhavishya 11 Sept 2025
आज तुम्ही एखाद्या किरकोळ गोष्टीचा फारच विचार कराल मन व्यथित करणारा एखादा प्रसंग घडेल. महत्त्वाच्या चर्चेत आपले मत मांडण्याची घाई करू नका.
वृषभ (शुभ रंग- राखाडी)
बेरोजगारांना घरापासून दूर रोजगाराच्या संधी येतील. राशीच्या वयात चंद्र असताना खर्च करावाच लागतो. गृहिणींना पूर्वीची बचत कामी येईल.
मिथुन (शुभ रंग – लाल)
उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने आज अनुकूल दिवस. नवीन व्यावसायिकांच्या अथक प्रयत्नांना यश येईल. कार्यक्षेत्रात आता यश जवळच आल्याचे जाणवेल.
कर्क ( शुभ रंग- तांबडा)
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून आज तुम्हाला पूर्ण सहकार्य असेल. कामाच्या ठिकाणी वाढत्या जबाबदाऱ्या आनंदाने स्वीकाराल. आज मित्रांना जरा लांबच ठेवा.
सिंह ( शुभ रंग- आकाशी) Rashi Bhavishya 11 Sept 2025
डुक्करदारांना साहेबांच्या मागेपुढे करावेच लागणार आहे व्यावसायिकांनी फार मोठी रिस्क घेऊ नये घरात ज्येष्ठांनी आध्यात्मिक मार्गात रमणेच हिताचे राहील.
कन्या (शुभ रंग- निळा)
आज दिवस तुमच्यासाठी अनुकूल नाही. क्षुल्लक कामातही अडचणीचे डोगर उभे राहतील. वैवाहिक जीवनातील सौम्य मतभेद फार ताणू नका.
तूळ (शुभ रंग- हिरवा)
आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल आहे. सर्व कामे सुरळीत पार पडतील. वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी राहील. मुले ही शहाण्यासारखी वागतील.
वृश्चिक ( शुभ रंग- सोनेरी)
ज्येष्ठ मंडळींनी तब्येतीला जपावे. काही जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्यावर ताबा ठेवा. काही येणी अचानक वसूल होतील.
PMPML: विमानतळावरून मेट्रो फीडर बससाठी PMPMLची मागणी
धनु (शुभ रंग- भगवा) Rashi Bhavishya 11 Sept 2025
आधुनिक विचारसरणी असलेले लोक आज संपर्कात येतील. आज तुम्ही व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. आवडते छंद जपण्यासाठी वेळ काढाल.
मकर (शुभ रंग- क्रीम)
वर्क फ्रॉक होम करणाऱ्यांवर कामाचा ताण वाढणार आहे. गृह उद्योग करणाऱ्या महिलांची मिळकत वाढेल. जागेचे व्यवहार करण्यासाठी आज चांगला दिवस आहे.
कुंभ ( शुभ रंग- जांभळा)
हाती असलेला पैसा खर्च करण्याचे विविध मार्ग सुचतील. मोठ्या मनाने आज तुम्ही गरजूंना मदतीचा हात द्याल. तुमचा जास्त वेळ आज घराबाहेरच जाईल.
मीन ( शुभ रंग – पांढरा)
आज राशीच्या धनस्थानातून चंद्र भ्रमण होत असताना आवश्यक पैसा सहज उपलब्ध होईल. आज वाणीवर लगाम गरजेचा आहे. नेते मंडळी सभा गाजवतील.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424