मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – श्रावण – कृष्णपक्ष. तिथी – ०२ (१२.११ पर्यंत) शके १९४७. वार – सोमवार. तारीख – ११.०८.२०२५. (Rashi Bhavishya 11 August 2025)
शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
आज विशेष – शिवमुष्टी – (मूग).
राहू काळ – सकाळी ७.३० ते ०९.००.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – शततारका १३.०० पर्यंत नंतर पूर्वा भाद्रपदा. चंद्र राशी – कुंभ.
मेष- (शुभ रंग- डाळिंबी) Rashi Bhavishya 11 August 2025
आज कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल. उपवारांना सुयोग्य स्थळे सांगून येतील. चैनी व विलासी वृत्ती बळावेल. आवडत्या छंदासाठी वेळ व पैसा खर्च कराल.
वृषभ (शुभ रंग- निळा)
नोकरीच्या ठिकाणी काही वाढीव जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागणार आहेत. आज मित्रांनी दिलेल्या आश्वासनांवर अवलंबून राहून चालणार नाही.
मिथुन (शुभ रंग – गुलाबी)
नोकरदारांवर वरिष्ठांचे दडपण राहील. आज शासकीय नियम काटेकोरपणे पाळावे लागतील. ध्येयपूर्तीसाठी उच्चशिक्षितांना परदेश गमनाच्या संधी चालून येतील.
कर्क ( शुभ रंग- राखाडी)
उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने आज विरोधी दिवस आहे. दुकानदारांना ग्राहकांची वाट बघावी लागेल. व्यवसायात जाहिरात वाढवावी लागणार आहे.
Vadgaon Maval : कृष्णराव भेगडे यांचे कार्य मावळच्या इतिहासातील सुवर्णपान
सिंह ( शुभ रंग- मोतिया) Rashi Bhavishya 11 August 2025
आज फक्त आपल्या स्वार्थाचा विचार करा. भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊ नका. आज जोडीदाराला दिलेला शब्द मात्र आवर्जून पाळावा.
कन्या (शुभ रंग- जांभळा)
आज अति आक्रमकता नुकसानाला कारणीभूत होईल. महत्त्वाच्या प्रश्नात जोडीदाराचे मत अवश्य घ्या. हौस मौज करताना कायद्याचे भान ठेवा.
तूळ (शुभ रंग- सोनेरी)
तरुणांच्यात चैनी व विलासी वृत्ती वाढेल. मॉलमधील ब्रँडेड वस्तू गृहिणींना आकर्षित करतील. कलावंत आज मिळालेल्या संधीचे सोने करतील.
वृश्चिक ( शुभ रंग- चंदेरी)
आज मुले मान मोडून अभ्यास करतील. घरात सज्जनांची उठबस असेल. गृहिणींना लघु उद्योगातून सांगली कमाई होईल. आईचे मन आज मोडू नका.
Mahakaleshwar Mahadev : कथा तिसऱ्या ज्योतिर्लिंगाची; श्री महाकालेश्वर महादेवाची
धनु (शुभ रंग- आकाशी) Rashi Bhavishya 11 August 2025
आज राशीच्या पराक्रम स्थानातून भ्रमण करणारा चंद्र चर्चेपेक्षा कृतीला प्राधान्य देण्यास सांगत आहे. लहान भावाला मदत करावी लागेल. घराबाहेर वाद टाळा.
मकर (शुभ रंग- मरून)
विविध मार्गाने पैसा येईल. आज आपले आवडते छंद जपण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. विवाह विषयक बोलणी सकारात्मकतेने पार पडतील.
कुंभ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
पूर्वी केलेली गुंतवणूक चांगला फायदा देईल. आज एखादी हरवलेली वस्तू गवसेल. मुले आज्ञेत वागतील. आज वैवाहिक जीवनात तू तिथे मी असे वातावरण असेल.
मीन ( शुभ रंग – पिस्ता)
खर्च कितीही वाढला तरी पैसा कमी पडणार नाही. तुमची मोठ्या लोकांमधील उठवसं फायदेशीरच राहील. कलाकारांचा परदेशात नावलौकिक होईल.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424