Team MyPuneCity – आजचे पंचांग- ०२.०४.२०२५ (Rashi Bhavishya 2 April 2025). आजचा दिवस- बुधवार. शुभाशुभ विचार – ०९ नंतर चांगला.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी १२.०० ते ०१.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र- कृत्तिका ०८.५० पर्यंत नंतर रोहिणी.
चंद्र राशी – वृषभ.
—————————-
मेष – ( शुभ रंग – डाळिंबी) Rashi Bhavishya 2 April 2025
तुमची आर्थिक आवक उत्तम असेल. आज विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील. काही नाती आज गोड बोलूनच जपावी लागतील. शब्द जपून वापरा.
वृषभ ( शुभ रंग- भगवा)
आज कार्यक्षेत्रात तुमचा उत्साह वाढवणाऱ्या काही घटना घडतील. इतरांच्या भांडणात तुम्ही यशस्वी मध्यस्थी कराल. आज वैवाहिक जीवनातील लज्जतही वाढणार आहे.
मिथुन – ( शुभ रंग- मोतिया)
आज दिवस खर्चाचा असताना बिनधास्त खर्च करा. गृहिणींना पूर्वीची बचत कामी येईल. तरुण मंडळी मॉल मधील ब्रॅण्डेड वस्तूंची खरेदी करतील.
कर्क – ( शुभ रंग – जांभळा)
आज दिवस लाभाचा असल्याने वाढत्या खर्चातही पैशाची कमतरता भासणार नाही. आपला मोठेपणा जपण्यासाठी सुद्धा तुम्ही सढळ हाताने खर्च कराल.
Palkhi ceremonies: श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याला भाविकांचा अभूतपूर्व प्रतिसाद
सिंह – ( शुभ रंग – पांढरा) Rashi Bhavishya 2 April 2025
उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने आज अनुकूल दिवस. नवीन व्यवसायिकांच्या अथक प्रयत्नांना यश येईल. कार्यक्षेत्रात यशाची चढती कमान राहील.
कन्या – ( शुभ रंग- आकाशी)
शासकीय कामात दिरंगाई होईल. अध्यात्मिक मार्गात असणाऱ्यांना एखादी दिव्य प्रचिती येईल. श्रद्धाळू गृहिणींचा यथाशक्ती दानधर्म चालूच राहील. सामान्य दिवस.
तूळ ( शुभ रंग- पिस्ता)
व्यवसायात मर्यादे बाहेर आर्थिक उलाढाली आज टाळा. यंत्रावर कामे करणाऱ्यांनी आज आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी. पत्नीचे सल्ले डावलू नका.
वृश्चिक ( शुभ रंग- निळा)
आज तुमचे मनोबल उत्तम असल्याने कार्यक्षेत्रातील आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. महत्त्वाचे निर्णय घेताना मात्र आज द्विधा मनस्थिती होऊ शकते.
PCMC : जागरूक करदात्यांनी भरला तब्बल ९६६ कोटींचा मिळकतकर
धनु – ( शुभ रंग – राखाडी) Rashi Bhavishya 2 April 2025
कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी मेहनत वाढवाल. आज कुणालाही काही सल्ले न देता फक्त स्वार्थ साधून घेण्यास प्राधान्य द्या. आज प्रयत्नांती परमेश्वर.
मकर – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज तुमच्यासाठी उत्साहपूर्ण दिवस आहे. सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. आज एखादा नवीन विषय आत्मसात करण्याचा तुमचा प्रयत्न राहील.
कुंभ – (शुभ रंग- गुलाबी)
आज तुम्ही कुटुंबीयांना तुमचा जास्तीत जास्त वेळ द्याल. मुले आज पालकांच्या अपेक्षा पूर्ण करतील. नवोदित कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागतील.
मीन ( शुभ रंग – मरून)
आज मोफत सल्लागार बरेच भेटणार आहेत. ऐकाल जनाचे पण कराल मात्र आपल्या मनाचे. प्रवासात काही नवीन नाती जुळतील. शेजारी आपलेपणाने वागतील.
– जयंत कुळकर्णी
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार
फोन 9689165424