Team MyPuneCity – आजचे पंचांग- ०१.०४.२०२५ (Rashi Bhavishya 1 April 2025). आजचा दिवस- मंगळवार. शुभाशुभ विचार – ११ पर्यंत चांगला.
आज विशेष – विनायक चतुर्थी.
राहू काळ – दुपारी ३.०० ते ०४.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र- भरणी ११.०७ नंतर कृत्तिका.
चंद्र राशी – मेष १६.३० पर्यंत नंतर वृषभ.
—————————-
मेष – ( शुभ रंग – राखाडी) Rashi Bhavishya 1 April 2025
तुम्ही पूर्वी केलेली एखादी गुंतवणूक चांगला लाभ देईल. आज एखादी हरवलेली वस्तू सापडेल. वैवाहिक जीवनात आज सुसंवाद असेल. तुमची मुले ही आज्ञेत वागतील.
वृषभ ( शुभ रंग- आकाशी)
खर्च कितीही वाढला तरी पैसा कमी पडणार नाही. तुमची मोठ्या लोकांमधील उठ बस फायदेशीर राहील उच्च शिक्षकांना विदेश गमनाच्या संधी येतील.
मिथुन – ( शुभ रंग- निळा)
कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध निर्माण होतील उपवारांना स्थळे सांगून येतील. चैनी व विलासी वृत्ती बळावेल. आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल.
कर्क – ( शुभ रंग – मोतिया)
नोकरीच्या ठिकाणी काही वाढीव जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. आज फक्त आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्याल. मित्रांना दुरूनच राम राम करा.
Talegaon Dabhade RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तळेगाव दाभाडे नगर संघचालकपदी विक्रम दाभाडे
सिंह – ( शुभ रंग – पिस्ता) Rashi Bhavishya 1 April 2025
नोकरदारांवर वरिष्ठांचे दडपण राहील. आज शासकीय नियम काटेकोरपणे पाळावे लागतील. ध्येयपूर्तीसाठी कामाचे तास वाढवणे गरजेचे आहे. आज दानधर्म कराल.
कन्या – ( शुभ रंग- जांभळा)
उद्योग धंद्याच्या दृष्टीने आज विरोधी दिवस असून नोकरदारांना साहेबांचे मूड सांभाळावे लागतील. आज हातचे सोडून पळत्या मागे अजिबात जाऊ नका.
तूळ ( शुभ रंग- भगवा)
आज तुम्ही फक्त आपल्या भल्याचा विचार करा. भावानेच्या भरात कोणालाही वचने देऊच नका. आज तुम्ही जोडीदाराच्या चुका काढण्याची चूक अजिबात करू नका.
वृश्चिक ( शुभ रंग- क्रीम)
आज अती आक्रमकता नुकसानाला कारणीभूत होईल महत्त्वाच्या प्रश्नात जोडीदाराचे मत अवश्य घ्या. हौस मौज करताना कायद्याचे बंधन पाळा.
Vallabhesh Mangalam marriage ceremony : वल्लभेश मंगलम् विवाह सोहळा थाटात साजरा
धनु – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी) Rashi Bhavishya 1 April 2025
तरुणांच्यात चैनी व विलासी वृत्ती बळावेल. मॉलमधील ब्रँडेड वस्तू गृहिणींना आकर्षित करतील. कलावंत आज मिळालेल्या संधीचे सोनेच करतील.
मकर – ( शुभ रंग – भगवा)
मुले आज मान मोडून अभ्यास करतील. घरात सज्जनांची उठबस राहील. गृहिणींना लघु उद्योगातून चांगली मिळकत होईल. आज आईचे मन आज मोडू नका.
कुंभ – (शुभ रंग- मरून)
आज राशीच्या पराक्रम स्थानातून चंद्रभ्रमण होत असताना चर्चेपेक्षा कृतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. लहान भावाला मदत कराल. घराबाहेर वादविवाद टाळा.
मीन ( शुभ रंग – पांढरा)
विविध मार्गाने पैसा येईल आज आपले आवडते छंद जपण्यासाठी मनापासून खर्च कराल. विवाह विषयक बोलणी सकारात्मकतेने पार पडतील.
– जयंत कुळकर्णी
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार
फोन 9689165424