मावळ ऑनलाईन –मावळ तालुक्यातील पुसाणे येथे शिरगाव पोलिसांनी दारूभट्टीवर छापा मारला. या कारवाई मध्ये एक लाख 48 हजार रुपयांचे रसायन नष्ट करण्यात आले आहे. ही कारवाई रविवारी (13 जुलै) रात्री करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल योगेश गुळीग यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पुसाने फाटा येथील 38 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jadhavwadi: कंपनीतील साहित्याची चोरी; दोघांना अटक
MLA Mahesh Landge : उद्योग क्षेत्रातून टॅक्स घेता, मग सुविधा का देत नाही?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुसाणे गावात स्मशानभूमी जवळ दारूभट्टी सुरू असल्याची माहिती शिरगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी रात्री दारूभट्टीवर छापा मारला. पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी महिला झाडाझुडपातून पळून गेली. दरम्यान पोलिसांनी या कारवाईमध्ये एक लाख 48 हजार रुपये किमतीचे दारू तयार करण्यासाठी लावलेले कच्चे रसायन नष्ट केले आहे.