situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: मर्सिडीज कारने दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू; चार सराईतांविरोधात गुन्हा दाखल

Published On:
Kamshet Crime News
---Advertisement---

Team MyPuneCity –सिंहगड रोड परिसरात भरधाव मर्सिडीज कारने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. अपघातानंतर चौकशीत चालक व अन्य आरोपींनी मादक पदार्थांचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले असून, चौघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी प्रज्योत पुजारी (वय २१, रा. तानाजी नगर, चिंचवड, पुणे) यांनी दिलेल्या माहितीवरून सिंहगड रोड पोलिसांनी शुभम राजेंद्र भोसले (वय २७, रा. ऑर्थोड व्हिला, फ्लॅट नं. ६१३, निगडी प्राधिकरण), वेदांत इंद्रसिंग रजपूत (वय २८, रा. इंद्रायणी रो हाऊस, निगडी प्राधिकरण), निखील मिलींद रानवडे (वय २६, रा. साई रेसीडेन्सी, औंध गाव), आणि श्रेयस रामकृष्ण सोळंकी (वय २५, रा. साणे चौक, ड्रिमपार्क सोसायटी, पिंपरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील श्रेयस सोळंकी यास अटक करण्यात आली आहे.

Suhas Garud : राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय सेलच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी सुहास गरुड

ही घटना ३ मे २०२५ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास सिंहगड रोडवरील वडगाव ब्रिजच्या सुरूवातीस विश्वास हॉटेलसमोर घडली. फिर्यादी आणि त्यांचा मित्र कुणाल हुशार हे मोटारसायकलवरून घरी जात असताना मागून भरधाव वेगात आलेल्या मर्सिडीज कारने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या कुणाल हुशार (वय २३, रा. शिवाजी उदय मंडळाजवळ, चिंचवड) याचा उपचारादरम्यान नवले हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

Shailendra Devlankar: ‘टॅरिफ युद्ध ही भारतासाठी सुसंधी!’ – डॉ. शैलेंद्र देवळाणकर

पोलिस तपासात आरोपी शुभम भोसले याने मादक पदार्थाचे सेवन करून निष्काळजीपणे व वेगात कार चालवली असल्याचे निष्पन्न झाले. ससून रुग्णालयात केलेल्या वैद्यकीय तपासणीतही त्याच्या शरीरात मादक पदार्थांचे अंश आढळले आहेत. इतर आरोपीही नशेत असल्याचे निदर्शनास आले असून, त्यांना माहिती असतानाही चालकास वाहन चालविण्यास अनुमती दिली.

सदर प्रकरणात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०५, २८१, १२५(अ)(ब) आणि मोटार वाहन कायद्यातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Follow Us On