मावळ ऑनलाईन – पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि., पुणेचे जेष्ठ ( Pune People’s Bank) संचालक व माजी अध्यक्ष सीए जनार्दन रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि १५) रोजी पार पडलेल्या मा. संचालक मंडळाच्या सभेत सन २०२५-२६ या वर्षासाठी श्रीधर गायकवाड यांची अध्यक्ष पदी व बिपीनकुमार शहा यांची उपाध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली.
Rashi Bhavishya 17 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?
श्रीधर गायकवाड हे यशस्वी उद्योजक असुन श्रीधर फॅब्रिकेशन या मान्यताप्राप्त कंपनीचे संस्थापक
आहेत. याशिवाय ते जंगली महाराज आश्रम कोकमठाणचे विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. सहकारातील एक तरुण, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जातात.
बिपीनकुमार शहा हे प्रतिथयश व्यावसायिक असुन अनेक जैन संस्था, संघटनांच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासुन सक्रियपणे काम ( Pune People’s Bank) करीत आहेत.
पुणे पीपल्स को-ऑप. बँक ही महाराष्ट्र राज्यातील मल्टीस्टेट को-ऑप बँकांमधील एक अग्रगण्य बँक असुन ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेने एकूण व्यवसायाचा २७०६ कोटीचा टप्पा पार केला आहे. यामध्ये ठेवी रु.१६३३ कोटी, कर्जे रु.१०७३ कोटीचा समावेश आहे. बँकेची निव्वळ एन.पी.ए.ची टक्केवारी ०% सी.डी. रेशो ६५.७०%, सीआरएआर १५.५९%, निव्वळ नफा रु.१७.४६ कोटी असल्याची त्याचबरोबर प्रती कर्मचारी व्यवसाय रु.१२.०८ कोटी असल्याचे तसेच अहवाल वर्षासाठी सभासदांना १५.००% दराने लाभांश दिल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष श्री श्रीधर गायकवाड यांनी दिली.
सुरक्षा, पारदर्शी व्यवहार आणि ग्राहकहित ही बँकेची त्रिसूत्री असुन २३ शाखासह बँक गेली सुमारे ७४ वर्षांपासुन यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. चालू वर्ष अखेर बँकेचा एकूण व्यवसाय ३००० कोटी पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याचे अध्यक्षांनी नमुद ( Pune People’s Bank) केले.