situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Metro : भक्तीशक्ती चौक ते पीसीएमसी मार्गिकेतील पहिले ‘सेगमेंट’ बसवण्याचे काम सुरु

Published On:
Pune Metro
---Advertisement---

Team MyPuneCity – पुणे मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी आणि पीसीएमसी या मार्गिकेचा विस्तार असणाऱ्या पीसीएमसी ते भक्तीशक्ती चौक या (Pune Metro) मार्गिकृतील पहिल्या पिअरच्या कामाला ६ जुलै २०२४ रोजी सुरुवात करण्यात आली होती. या मार्गिकेचे काम वेगाने सुरु असून बुधवारी (२३ एप्रिल) या विस्तारित मार्गिकेवरील चिंचवड स्थानक ते आकुर्डी स्थानक या दरम्यान असणाऱ्या खंडोबा माळ चौक येथे सेगमेंट लाँचिंग गर्डरची उभारणी करण्यात आली आहे. पिअर क्रमांक ४५३ व ४५४ मधील १२ सेगमेंट लावण्याच्या कामाला सुरुवात झाली. या दोन खांबामधील १२ सेगमेंट पैकी बुधवारी ४ सेगमेंट लावण्याचे काम पूर्ण झाले. उर्वरित ८ सेगमेंटचे काम प्रगतीपथावर आहे.

या विस्तारित मार्गिकेमध्ये चिंचवड स्थानक, आकुर्डी स्थानक, निगडी आणि भक्ती-शक्ती स्थानक अशी ४ स्थानके आहेत. या विस्तारित मार्गिकेमध्ये १५१ पियर व १३३७ सेगमेंट असणार आहेत. १३३७ सेगमेंट पैकी ५१७ सेगमेंटचे कास्टिंग पूर्ण झाले आहे. विस्तारित मार्ग पिंपरी चिंचवड क्षेत्रातील प्रमुख भागांना जोडेल. चिंचवड स्थानक व्यावसायिक, निवासी, औद्योगिक आणि धार्मिक स्थळे आणि चिंचवड भारतीय रेल्वे स्थानकाशी जोडण्यात येईल. आकुर्डी स्थानक निवासी, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रांची पूर्तता करेल; निगडी आणि भक्ती-शक्ती स्थानके निवासी, मनोरंजन आणि धार्मिक स्थळे जोडतील. तसेच देहू, चिखली, तळेगाव आणि वडगाव यांसारख्या निमशहरी भागांना (Pune Metro) जोडणाऱ्या शहर बस आगारांशी जोडली जात आहेत.

महामेट्रोचे व्ययस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर म्हणाले, पीसीएमसी ते निगडी मार्गावरील पहिल्या स्पॅनची उभारणी सुरु झाली आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आम्ही हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध (Pune Metro) आहोत.

Follow Us On