situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune-Lonavala Local Train : मालगाड्या, एक्सप्रेस गाड्या धावतात मग दुपारी लोकल का नाही धावू शकत; प्रवाशांचा संतप्त सवाल

Published On:
Local train

मावळ ऑनलाईन – पुणे–लोणावळा या मार्गावरील ( Pune-Lonavala Local Train )दुपारच्या वेळेतील लोकल गाड्या पुन्हा सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच खासदार श्रीरंग बारणे यांना दिलेल्या लेखी पत्रात “दुपारी बारा ते तीन या वेळेत ट्रॅकच्या देखभाल व दुरुस्तीची कामे सुरू असल्याने लोकल सुरू करणे शक्य नाही,” असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांचा संभ्रम व संताप आणखीनच वाढला आहे.

Lonavala Rain : लोणावळ्यात मुसळधार पाऊस; पुढील ४८ तास रेड अलर्ट

प्रवाशांचा सवाल : ( Pune-Lonavala Local Train )

कोरोना काळापूर्वी या वेळेत दोन लोकल गाड्या सुरू होत्या. आता मात्र “ट्रॅक दुरुस्ती”चे कारण सांगत लोकल बंद ठेवण्यात येत आहे. पण त्याच वेळेत अनेक मालगाड्या व एक्सप्रेस गाड्या धावताना दिसतात. “दुपारी मालगाड्या व एक्सप्रेस चालतात मग लोकल का नाही?” असा प्रश्न प्रवासी संघटना उपस्थित करत आहेत. याशिवाय, रात्री ११.१५ वाजता शिवाजीनगरहून सुटणारी तळेगाव लोकल देखील रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे “रात्री कोणती ट्रॅकची दुरुस्ती होते?” असा उपरोधिक सवाल प्रवाशांनी केला आहे.

 Achyut Potdar : ज्येष्ठ मराठी अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन

खासदार श्रीरंग बारणे यांचा पाठपुरावा ( Pune-Lonavala Local Train )

  • कोरोना साथीच्या काळात बंद झालेल्या लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी श्रीरंग बारणे यांनी सातत्याने प्रयत्न केले.
  • ७ डिसेंबर २०२३ रोजी तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र दिले.
  • २० मे २०२५ रोजी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनाही लेखी पत्र दिले.
  • सभागृहात मुद्दा उपस्थित करून दुपारच्या लोकल सेवा पूर्ववत करण्याची मागणी केली.

याबाबत अखेर रेल्वेमंत्री वैष्णव यांनी ११ ऑगस्ट रोजी लेखी उत्तर दिले. मात्र “ट्रॅक दुरुस्ती”चे कारण देत दुपारच्या लोकल सेवा सुरू करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.

प्रवाशांच्या प्रलंबित मागण्या ( Pune-Lonavala Local Train )

१) कोल्हापूर–पुणे सह्याद्री एक्सप्रेस विनाविलंब मुंबईपर्यंत नेण्यात यावी.
२) बारामती–कर्जत पॅसेंजर गाडी पूर्ववत सुरू करण्यात यावी.
३) इंद्रायणी एक्सप्रेसला तळेगाव स्टेशनवर थांबा द्यावा.
४) महिला पोलिस, प्रकाशयोजना आणि स्वच्छतेची सोय करण्यात यावी.

आंदोलनाचा इशारा ( Pune-Lonavala Local Train )

या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा निरंजन फलके, दिलीप डोळस, अमित प्रभावळकर ,सुरेश चौधरी व विलास सोनवणे या स्थानिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

“उपनगरीय सेवेबाबत सातत्याने दुजाभाव होत आहे,” असा आरोप सामाजिक कार्यकर्ते व प्रवासी संघटनांकडून करण्यात आला आहे.

Follow Us On