मावळ ऑनलाईन – पुणे ते लोणावळा या प्रवासी (Pune-Lonavala Local) व मालवाहतूक दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका तयार होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला असून, यामुळे पुणे-मुंबई कॉरिडॉरची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
Aundh Crime News : औंधमध्ये वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याला रिक्षाचालकाकडून सिमेंटच्या गट्टूने मारहाण
या प्रकल्पासाठी तब्बल ₹५,१०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राज्य आणि केंद्र सरकार प्रत्येकी ५० टक्के निधी उचलणार असून, राज्य सरकार जमीन मोफत उपलब्ध करून देणार आहे. कामाचा कालावधी साधारण ५ वर्षांचा असून, जमीन अधिग्रहण, निविदा प्रक्रिया आणि बांधकामाच्या गतीवर पूर्णत्वाची मुदत अवलंबून आहे.
सध्याची परिस्थिती (Pune-Lonavala Local)
सध्या पुणे-लोणावळा मार्गावर २१ लोकल गाड्यांच्या दोन फेऱ्या (एकूण ४२ लोकल) तसेच अन्य गाड्यांसह एकूण ७९ गाड्या धावत आहेत. रोज जवळपास २ लाख प्रवासी या मार्गावर प्रवास करतात. लोकल ट्रेनला ६४ किमी अंतर कापण्यासाठी साधारण १ तास २० ते २५ मिनिटे लागतात. या गर्दीमुळे प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागतो आणि गाड्यांच्या वेळेत वारंवार विलंब होतो.
Rashi Bhavishya 23 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
नवीन मार्गिकेमुळे होणारे फायदे
७० अतिरिक्त गाड्या धावण्याची शक्यता
लोकलची गर्दी कमी होणार
प्रवास वेळेत सुधारणा
मालवाहतुकीची क्षमता दुप्पट होणार
पुणे-मुंबई कॉरिडॉरवरील ताण कमी होणार (Pune-Lonavala Local)
इतिहासाची पार्श्वभूमी
पहिली रेल्वे लाइन पुणे-लोणावळा मार्गावर १८५६-१८५८ दरम्यान जीआयपीआरने (ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे) बांधली.
दुसरी लाइन १९२८-२९ मध्ये टाकण्यात आली आणि नंतर १९७८ पासून या मार्गावर लोकल सेवा सुरू झाली.
या प्रकल्पामुळे पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी लोकल प्रवास अधिक सुखकर व सोयीस्कर होणार असून, अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली (Pune-Lonavala Local) आहे.