मावळ ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या ( Pune League Kabaddi Tournament)सहकार्याने “ सतेज संघ,बाणेर यांच्या वतीने “ कबड्डी महर्षी स्व. शंकरराव ऊर्फ बुवा साळवी चषक निमंत्रित पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा – २०२५ व “ बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्या विद्यमाने पुरुष व महिला पुणे लीग कबड्डी स्पर्धेत पुरुष विभागात वेगवान पुणे तर महिला विभागात बलाढ्य बारामती संघाने अंतिम विजेते पद पटकाविले.
पुणे लीग कबड्डी स्पर्धेच्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात वेगवान पुणे संघाने झुंजार खेड संघावर ४६-३७ असा विजय मिळवित स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. मध्यंतराला वेगवान पुणे संघ १५-१९ असा पि ( Pune League Kabaddi Tournament)छाडीवर होता. वेगवान पुणे संघाच्या दिपक सांगळे व कृष्णा काळभोर यांनी मध्यंतरानंतर आक्रमक खेळ करीत झुंजार खेडचा बचाव खिळखिळा केला व आपल्या संघाची पिछाडी भरून काढत विजय खेचून आणला.
Publication of a book : ‘छोट्या अणूची मोठी गोष्ट’तून माणूसपणाचीही मांडणी – डॉ. श्रीपाल सबनीस
ओंकार लाळगे याने सुरेख पकडी घेतल्या. झुंजार खेड संघाच्या महेश यादव, सौरभ आव्हाळे यांनी चांगली लढत दिली. त्यांनी पहिल्या डावात आक्रमक खेळ केला मात्र मध्यंतरानंत ( Pune League Kabaddi Tournament)र ते ढेपाळले आणि पराभवाचा सामना करावा. कृष्णा चव्हाण व प्रदीप भगत यांनी काही चांगल्या पकडी घेतल्या.

महिला विभागात अतंत्य अटितटीच्या झालेल्या सामन्यात बलाढ्य बारामती संघाने शिवनेरी जुन्नर संघावर ३७-३५ असा निसटता विजय मिळवित पुणे लीग कबड्डी स्पर्धेचे विजेते पद पटकाविले. मध्यंतराला बलाढ्य बारामती संघाकडे १८-१५ अशी आघाडी होती.
बलाढ्य बारामतीच्या वर्षा बनसुडे व वैभवी जाधव यांनी चौफेर आक्रमण करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तर सिध्दी बलकवडे व साक्षी गावडे यांनी सुरेख पकडी ( Pune League Kabaddi Tournament) केल्या. शिवनेरी जुन्नर संघाच्या किर्ती कडगंची व अंकिता सहा यांनी जोरदार प्रतिकार केला. पूजा तेलंग व सविता गवई यांनी पकडी घेतल्या.