Team MyPuneCity – बॅंक खाते अद्ययावत करण्याची बतावणी ( Pune Crime News) करून सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या खात्यातून एक लाख ३८ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.
Pimpri News : मोहननगर येथे सहा दिवसीय शिव – फुले – शाहू – आंबेडकर – लोकमान्य व्याख्यानमालेची वैचारिक मेजवानी
याबाबत एका ज्येष्ठ महिलेने सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ६४ वर्षीय ज्येष्ठ महिला सिंहगड रस्ता भागात राहायला आहेत .त्यांच्या मोबाईलवर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला.
बँकेतून बोलत असून, बॅंक खाते अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. बॅंक खाते अद्ययावत न केल्यास खाते बंद पडेल, अशी बतावणी चोरट्यांनी केली.
Suhas Garud : राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय सेलच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी सुहास गरुड
त्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या बॅंक खात्याची गोपनीय माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करून चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून एक लाख ३८ हजार रुपयांची रोकड स्वतःच्या खात्यात हस्तांतरित केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे तपास करत ( Pune Crime News) आहेत.