Team MyPuneCity –हडपसर परिसरात भरधाव वेगात टॅंकर चालवत एका दुचाकीस्वाराला जोराची धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. ही घटना २१ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पुणे-सासवड रोडवरील बालाजी फूड मार्केटिंगसमोर (Pune Crime News 22 April 2025)घडली.
या प्रकरणी आप्पासो सबळकर (वय ४०, रा. हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मृत इसमाचे नाव ईश्वर साहू असून तो सातववाडी, हडपसर येथे वास्तव्यास होता. त्याचा कायमचा पत्ता छत्तीसगडमधील पनेका गाव, तहसील कवर्धा, जिल्हा दशरंगपूर आहे.
ईश्वर साहू आपल्या मोटारसायकलवरून जात असताना, अज्ञात टॅंकर चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत हयगयीने वाहन चालवून त्यास जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ईश्वर गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून न थांबता पळून गेला.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार करीत आहेत.
२. कोथरूडमध्ये घरफोडी; २ लाखांहून अधिक किंमतीचे दागिने चोरीला (Pune Crime News 22 April 2025)
पुणे – कोथरूडमधील शास्त्रीनगर परिसरात एका तरुणाच्या घरात घुसून चोरट्यांनी २ लाखांहून अधिक किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
ही घटना २० एप्रिलच्या रात्री ९.३० वाजल्यापासून ते २१ एप्रिलच्या पहाटे ६.३० या वेळेत मराठा महासंघ सोसायटी, गल्ली क्र. ३, शास्त्रीनगर, कोथरूड येथे घडली.
२५ वर्षीय तरुणाने या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाज्याचा कडी-कोंयडा उचकटून व कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील सुमारे २,०४,४०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप करत आहेत.
Dhaari News: जुनी धायरी आणि परिसरात २४ एप्रिल रोजी पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद
३. डेक्कन परिसरात गाडीवरून येऊन दोघांवर हल्ला; रोख रक्कम व मोबाईल हिसकावले (Pune Crime News 22 April 2025)
पुणे – डेक्कन परिसरात एका तरुणावर व त्याच्या मित्रावर गाडीवरून आलेल्या इसमाने अचानक हल्ला करून त्यांना मारहाण केली व जबरदस्तीने रोख रक्कम व मोबाईल हिसकावून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
ही घटना २१ एप्रिल २०२५ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास फायर ब्रिगेड ऑफिस शेजारील राजामंत्री उद्यानाजवळ घडली.
२४ वर्षीय तरुणाने डेक्कन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याचा ओळखीचा एक इसम गाडीवरून आला व त्याने फिर्यादी व त्याच्या मित्राला मारहाण करत त्यांच्या खिशातून ७,००० रुपये रोख व मोबाईल फोन हिसकावून घेत पळ काढला.
पोलिस उपनिरीक्षक अजय भोसले या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
४. कोथरूडमध्ये स्टॉकमध्ये नफा देण्याचे आमिष दाखवून १५ लाखांची फसवणूक (Pune Crime News 22 April 2025)
पुणे – कोथरूड परिसरात एका महिलेची तब्बल १५ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गुन्हेगाराने स्टॉक ट्रेडिंगमधून नफा देण्याचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला व पैसे उकळून कोणताही परतावा न देता फसवणूक केली.
या प्रकरणी ४५ वर्षीय महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही फसवणूक ४ जानेवारी २०२५ ते १६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून झाली.
फिर्यादीला एका मोबाईल धारकाने संपर्क साधत शेअर मार्केटमधील ‘ट्रेंडिंग स्टॉक’मध्ये नफा देण्याचे आश्वासन दिले. विश्वास संपादन केल्यानंतर फिर्यादीने त्याच्या सांगण्यावरून आपल्या बँक खात्यातून १५,००,००० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. मात्र, त्यानंतर ना नफा मिळाला, ना पैसे परत.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रमसिंह कदम करत आहेत.