situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune:बंदिश निर्गुण निराकार रागाची सगुण साकार मूर्ती : डॉ. माधुरी डोंगरे

Published On:
---Advertisement---

गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर स्मृती गुरू गौरव पुरस्काराने सन्मान
93व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम

Team MyPuneCity –संगीत साधनेतून रागसंगीताचा ओढा वाढला त्यातून अध्यात्माशी जोडले गेले, त्या ध्यासातून स्वरांशी अनुसंधान साधत नवनिर्मितीचा आनंद घेतला. निर्गुण निराकार रागांची उपासना करणे अवघड आहे. बंदिशींच्या माध्यमातून या निर्गुण निराकार रागांची सगुण साकार मूर्ती तयार होते. नाद देवतेची भक्ती करताना भक्त वेगवेगळ्या भावातून, भूमिकेतून रचना साकारत असतो, असे प्रतिपादन शास्त्रीय गायिका, गुरू आणि प्रसिद्ध बंदिशरचनाकार डॉ. माधुरी डोंगरे यांनी केले.

भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणेच्या 93व्या वर्धापन दिनानिमित्त पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर स्मृती गुरू गौरव पुरस्काराने डॉ. माधुरी डोंगरे यांचा गौरव करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. पुरस्काराचे वितरण जीएसटी आयुक्त दिनेश भोयर यांच्या हस्ते झाले. गांधर्व महाविद्यालय, पुणेचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे, उपप्राचार्या परिणिता मराठे यांची उपस्थिती होती. पुरस्काराचे स्वरूप भेटवस्तू आणि 21 हजार रुपये असे होते. डॉ. डोंगरे यांच्याशी मंजिरी जोशी यांनी संवाद साधला.

गांधर्व महाविद्यालय, पुणेच्या 93व्या वर्धापन दिनानिमित्त प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी महाविद्यालयाला दोन लाख रुपयांची देणगी जाहीर केली. तसेच गुरुकुलातील विद्यार्थी मयुरेश गाडगीळ, सविता हेगडे, विजय तुळसकर, आर्यन देशपांडे यांना संवादिनी भेट दिली.

डॉ. डोंगरे म्हणाल्या, पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी दर्शविलेल्या वाटेवर चालण्याचा मी प्रयत्न केला आहे. गुरू पंडित विनायकबुवा पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या गांधर्व महाविद्यालयात सत्कार होत या विषयी कृतज्ञ आणि कृतार्थ आहे. माझ्यावर नाददेवतेचा कृपाआशीर्वाद कायम रहावा.

त्या पुढे म्हणाल्या, सहज मिळालेली संगीत कला सुलभ नाही, त्यासाठी रियाज करणे आवश्यक आहे. गुरू होणे सोपे नाही. मी स्वत:ला गुरू नव्हे तर शिक्षकाच्या भूमिकेत पाहते. शिक्षकाने विद्यार्थ्याला शास्त्रीय संगीताची गोडी लावणे हे अवघड काम आहे. गुरू म्हणजे तळमळ, त्याला विद्यार्थ्याच्या प्रगतीची तळमळ असणे आवश्यक आहे.

CEO Cabs : ‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम

संगीत क्षेत्रात महाविद्यालयीन शिक्षण आवश्यक असून त्याने विद्यार्थ्याचा पाया पक्का होती. त्याची गाणे शिकण्याची तयारी होते. फ्युजन, ऑन लाईन शिक्षण, यू-ट्यूब ही काळाची गरज आहे. फ्युजनच्या क्षेत्रात सर्जनशीलतेने काम करताना अभिजाततेचा गाभा सुटता कामा नये. विद्यार्थ्याने शरणागत भावाने नाद देवतेची प्रार्थना करत राहणे आवश्यक आहे, असे डॉ. डोंगरे म्हणाल्या.

दिनेश भोयर म्हणाले, कलाकाराने अभिजात शास्त्रीय संगीतातील शुद्ध भाव जपावेत.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डॉ. डोंगरे यांनी रचलेल्या बंदिशी त्यांच्या शिष्या पौरवी साठे, रमा कुलकर्णी, गायत्री गोखले, कस्तुरी जोशी यांनी सादर केल्या. त्यांना पुष्कर महाजन (तबला), मीनल नांदेडकर (संवादिनी) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेधा ढाके यांनी केले.

Follow Us On

Also Read