मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय (Prashant Dada Bhagwat)असलेले प्रशांत दादा भागवत यांनी बधलवाडी व मिंढेवाडी परिसरातील गणेश मंडळांना भेट देऊन मंडळाच्या कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला.
यावेळी अंकुश बधाले, बळीराम मराठे, सुरेश भोसले, रामनाथ बधाले, दत्तात्रय पडवळ, प्रेमराज मिंडे, सोमनाथ पडवळ, निलेश शेवकर, पप्पू डिंबळे, रवी कडलक
लहू बधाले, राहुल भागवत, संतोष मराठे यांसारखे अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याचा विश्वास देत, भागवत यांनी लोकसंपर्काचा नवा धागा मजबूत केला. लोकांशी असलेले थेट संवाद आणि गावोगावी होत असलेली उपस्थिती यामुळेच त्यांच्यावरील विश्वास व वाढता जनाधार स्पष्टपणे दिसून येतो.
Devendra Fadnavis : मी प्रत्येक समाजासाठी काम करत राहील-देवेंद्र फडणवीस
Sahara Old Age Home : गणेशोत्सवानिमित्त सहारा वृध्दाश्रमात हभप मोरे महाराज यांची किर्तन सेवा



जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून प्रशांत दादा भागवत यांना अशा उत्स्फूर्त स्वागतामुळे निश्चितच मोठा फायदा होईल, असा सूर ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.