मावळ ऑनलाईन – प्रशांत दादा भागवत स्पोर्ट फाउंडेशन यांच्या वतीने प्रगती विद्यामंदिर शाळेतील २४ खेळाडूंना तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी टी-शर्टचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे खेळाडूंमध्ये नवी उर्जा निर्माण झाली असून स्पर्धेसाठी त्यांच्या आत्मविश्वासात मोठी भर पडली आहे.
या कार्यक्रमास प्रगती विद्यामंदिरचे मुख्याध्यापक महादेव ढाकणे सर, क्रीडा प्रमुख नाईकरे सर, कदम सर, मिंडे सर, मकर सर, शिंदे सर, कर्डीले मॅडम, चव्हाण मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच शाळेचे खो-खो प्रशिक्षक सुधीर शिवेकर, वसीम तांबोळी, विठ्ठल पवार, विशाल चव्हाण यांनी खेळाडूंना मार्गदर्शन( Prashant Dada Bhagwat) केले.


Srirang Barne : श्रीरंग बारणे हाजिर हो!
या वेळी प्रतिक्रिया देताना प्रशांत दादा भागवत म्हणाले, “खो-खो हा आपला पारंपरिक खेळ असून मुलांनी यातून संघभावना, शिस्त आणि चिकाटी शिकावी हेच महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी खेळाच्या माध्यमातून पुढे यावे, यासाठी आमच्या फाउंडेशनतर्फे नेहमीच प्रयत्न सुरू राहतील. प्रगती विद्यामंदिरच्या खेळाडूंना आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा असून त्यांनी उत्तम कामगिरी करून शाळेचे व तालुक्याचे नाव उज्ज्वल ( Prashant Dada Bhagwat) करावे, अशी अपेक्षा आहे.”
Gajanan Mehendale : ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांना अखेरचा निरोप
टी-शर्ट वितरण प्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही प्रगती विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचे व परिसराचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रगती विद्यामंदिरचे सर्व शिक्षक, पालकवर्ग तसेच प्रशांत दादा भागवत स्पोर्ट फाउंडेशनचे सहकार्य ( Prashant Dada Bhagwat) लाभले.