situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Prashant Dada Bhagwat : प्रशांत दादा भागवत युवा मंचच्या आयोजनात ‘मनोरंजन संध्या’ उत्साहात संपन्न

Published On:

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झाले पोषक वातावरण

मावळ ऑनलाईन –प्रशांत दादा भागवत युवा मंच ( Prashant Dada Bhagwat) आणि अमरज्योत मित्र मंडळ, भीमाशंकर कॉलनी(वार्ड क्रमांक १, वराळे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मनोरंजन संध्या” हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. संपूर्ण परिसर आकर्षक प्रकाशयोजनांनी सजवण्यात आला होता. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, गीत-संगीत आणि मुलांच्या कलागुणांच्या सादरीकरणामुळे वातावरण आनंदमय झाले होते.

या कार्यक्रमात अमरज्योत मित्र मंडळ तसेच महिला मंडळातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग हा या संध्याकाळी विशेष ठरला. प्रशांत दादा भागवत यांच्या नेतृत्वाखालील या कार्यक्रमाने सामाजिक ऐक्य आणि एकतेचा सुंदर संदेश दिला.

Nutan Maharashtra Vidya Prasarak Mandal : पुणे जिल्हा संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या संचालकपदी नंदकुमार शेलार यांची बिनविरोध निवड

आमदार सुनील शेळके यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जाणारे प्रशांत दादा भागवत हे सध्या मावळ तालुक्यातील चर्चेचे केंद्रबिंदू ठरले आहेत. ( Prashant Dada Bhagwat) आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख सर्वत्र होत आहे. विशेष म्हणजे, गावागावांतून, विशेषतः माता-भगिनींकडून त्यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्या कार्याची दखल घेणारा ठरत आहे. त्यांच्या समाजाभिमुख कामामुळे युवक, शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदर व विश्वास वाढत आहे.

Leela Poonawalla Foundation : लीला पूनावाला फाउंडेशन एक वट वृक्ष: डॉ. किरण बेदी

प्रशांत भागवत यांनी समाजकार्यातून निर्माण केलेली लोकसंपर्काची साखळी आता राजकीय पातळीवरही दृढ होताना दिसते. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक, ( Prashant Dada Bhagwat) सांस्कृतिक आणि जनजागृती उपक्रम राबवले जात असून, त्यातून मावळात एक सकारात्मक आणि परिवर्तनशील वातावरण तयार झाले आहे.

या कार्यक्रमात बोलताना प्रशांत दादा भागवत म्हणाले की, “राजकारण हे सेवेसाठी असते, सत्तेसाठी नव्हे. जनतेच्या विश्वासाची कदर करून समाजाच्या सर्व घटकांसाठी काम करणे हेच आमचे ध्येय आहे. युवक आणि महिलांचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे.” त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

मनोरंजन संध्येसारख्या उपक्रमांमुळे सामाजिक एकता, संस्कृतीचे संवर्धन आणि जनतेशी थेट संवाद साधण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे मावळ तालुक्यात प्रशांत दादा भागवत ( Prashant Dada Bhagwat) यांच्या नेतृत्वाभोवती नव्या राजकीय उर्जेची आणि परिवर्तनाची लाट उसळताना दिसत आहे.

Follow Us On