मावळ ऑनलाईन – इंदोरी- वराळे, आंबी, वारंवाडी आणि गोळेवाडी परिसरात(Prashant Bhagwat) गणपती मंडळ भेटीच्या दौऱ्यात आमदार सुनील आण्णा शेळके युवा मंच व जिल्हा परिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवार प्रशांत दादा भागवत यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि फटाक्यांच्या रोषणाईत दादांचे आगमन झाले.
गावागावांतील वाड्या-वस्त्यांवर महिलांनी रांगोळ्यांनी स्वागताचा शुभसंदेश रेखाटला, तर युवकांनी मोठ्या उत्साहात “प्रशांत दादा भागवत यांचा विजय असो” अशा घोषणांनी वातावरण दणाणून सोडले.
Devendra Fadnavis: सिंहगड रस्त्यावर पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करून वाहतुकीसाठी झाला खुला
Vadgaon Maval News :विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त;शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सज्ज


यावेळी संतोष जांभुळकर, रवी कडलक, नवनाथ पडवळ, अतुल मराठे, शशिकांत शिंदे, कल्पेश मराठे, प्रवीण वारिंगे, गौरव लोंढे, भरत घोजगे, भानुदास दरेकर, बाबासाहेब घोजगे, निलेश लोंढे, बाबासाहेब मखामले,बाळासाहेब
मखामले ,स्वप्निल भुजबळ, शरद भोंगाडे, संतोष मराठे, शिवा मराठे व संजय मखामले आदी मान्यवर उपस्थित होते.
गावकऱ्यांनी यावेळी प्रशांत भागवत यांच्यासमोर आपली मते मांडताना, “गावोगावांच्या विकासासाठी दादा म्हणजे विश्वासार्ह नेतृत्व” असा विश्वास व्यक्त केला. प्रशांत दादा भागवत हे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार असून, त्यांना मिळणारा गावागावांतील उत्स्फूर्त प्रतिसाद हे त्यांच्या लोकप्रियतेचे व नागरिकांच्या अपेक्षांचे द्योतक ठरत आहे. दौऱ्यातील जल्लोष, नागरिकांचा प्रतिसाद आणि प्रशांत भागवत यांच्यावरील विश्वास यामुळे या निवडणुकीत नव्या राजकीय पर्वाची सुरूवात होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.