मावळ ऑनलाईन –पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा (Prakash Oswal)करावा असे आवाहन जैन इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष माजी नगरसेवक प्रकाश ओसवाल यांनी रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे व जैन सोशल ग्रुप आयोजित जय बजरंग तरुण मंडळाचे सहकार्याने डॉ भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय यांच्या सौजन्याने आयोजित केलेल्या भव्य मोफत आरोग्य तपासणी,रोगनिदान शिबिर,मोफत नेत्ररोग तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले.
महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश भेगडे यांनी आवर्जून आरोग्य शिबिरात भेट दिली.
गणेशोत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवून उत्सव साजरा करतात त्याबद्दल जय बजरंग मंडळाचे कौतुक करून अभिनंदन केले.
महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश भेगडे यांनी आवर्जून आरोग्य शिबिरास भेट दिली.
शिबिरामध्ये एकूण 148 रुग्णांनी लाभ घेतला तर 46 लोकांची हिमोग्लोबिन चाचणी करण्यात आली तर 33 लोकांनी रक्तदान केले.
याप्रसंगी डिस्ट्रिक्ट मेडिकल कमिटी चेअरमन डॉ नेहा कुलकर्णी यांनी आरोग्य शिबीर घेतलेल्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या व रोटरीच्या कार्याचा आढावा घेतला.
PMC : प्रारूप प्रभागरचनेवर पुणे महापालिकेकडे आतापर्यंत 380 हरकती, हरकतीत सीमारेषेत झालेल्या बदलांबाबत आक्षेप
Majha Bappa Gharoghari: ऑनलाईन बाप्पा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद! घरच्या गणरायाचे छायाचित्र पाठवा, जिंका 101 आकर्षक बक्षिसे!
याप्रसंगी जय बजरंग तरुण मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक सुरेशकाका जव्हेरी, जैन मंदिराचे विश्वस्त भवरमल संघवी,जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष हितेश राठोड,डॉ सौरभ मेहता,विनोद लोणारी,पंकज गुंदेशा, हे उपस्थित होते.


गोल्डन रोटरी च्या वतीने समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येत असल्याचे अध्यक्ष संतोष परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत ताये यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर सौरभ मेहता यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बसप्पा भंडारी,राकेश ओसवाल,विनोद राठोड,प्रदीप टेकवडे,प्रदीप मुंगसे,राकेश गरुड,मेधा शिंदे,सतीश राठोड,दीपक नळे,विशाल जव्हेरीव कुणाल जव्हेरी यांनी परिश्रम घेतले.