मावळ ऑनलाईन – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ( PMPML) पर्यटन बससेवेला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतीच आणखी एका पर्यटन बस सुरू करण्यात आली. पुणे-लोणावळा या मार्गावर ही सेवा सुरू झाली. प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे पर्यटन बस सेवा सुरू झालेला हा अकरावा मार्ग आहे.
Suicide attempt : इंद्रायणी नदीमध्ये युवकाला आत्महत्या करण्यापासून रोखण्यात अग्निशमन दलास यश
शुक्रवारी पीएमपीएमएलच्या तत्कालीन अध्यक्षा व व्यवस्थापकीय ( PMPML) संचालक दीपा मुधोळ-मुंडे यांनी या बसला निशाण दाखविले. यावेळी मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे, वाहतूक नियोजन अधिकारी नारायण करडे, जनसंपर्क अधिकारी किशोर चौहान आदी उपस्थित होते.
Natya Parishad : नाट्य परिषद महिला मंचाच्या पहिल्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
विविध कार्यालये, महाविद्यालये, शाळा, औद्योगिक व आयटी क्षेत्रातील नोकरदारांना ( PMPML) शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशी नजीकच्या धार्मिक व पर्यटन स्थळांना सहकुटुंब भेटी देतात. त्यांचा प्रवास आरामदायी, सुलभ व माफक दरात व्हावा म्हणून ‘पीएमपी’ने पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर 16 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून 1 मे 2023 रोजी धार्मिक व पर्यटन स्थळांसाठी पर्यटन बस सेवासुरु केली.
प्रत्येक आठवड्याचा शनिवार-रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी वातानुकूलित इ-बस पर्यटन बस सेवा उपलब्ध होती. आता आवश्यक तेवढे आरक्षण झाल्यास आठवड्याचे सातही दिवस ( PMPML) ही सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय झाला आहे.