मावळ ऑनलाईन – : वारकरी भाविक आणि नागरिकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) (PMPML) तर्फे श्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र भंडारा डोंगर या नव्या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या देहूनगरीपासून त्यांच्या तपोभूमी असलेल्या भंडारा डोंगरापर्यंत भाविकांसाठी आता थेट प्रवास सोपा होणार आहे.
Wagholi Crime News : वाघोलीत पीएमपीएमएल बसमध्ये महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
या नव्या बससेवेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आला. शुभारंभ प्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष माऊली दाभाडे, मावळ भाजप नेते रविंद्र भेगडे आणि भंडारा डोंगर संस्थांचे अध्यक्ष हभप बाळासाहेब महाराज काशीद यांनी हिरवा झेंडा दाखवून बससेवेचे उद्घाटन केले.
Kakade Engineering College : काकडे अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘दीक्षारंभ’ उत्साहात संपन्न
राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक वर्षभर देहू, आळंदी आणि भंडारा डोंगर येथे दर्शनासाठी येत असतात. परंतु भंडारा डोंगरावर चढण्यासाठी साधारण तीस ते चाळीस मिनिटांचा पायी प्रवास करावा लागत होता. त्यामुळे वयोवृद्ध भाविक आणि महिला-लहानग्यांना मोठा त्रास होत असे. नव्या बससेवेच्या माध्यमातून भाविकांना मोठा दिलासा मिळाला असून, दिवसभरात एकूण सात फेऱ्या या मार्गावर धावणार आहेत. त्यामुळे सोयीस्कर प्रवासासह दोन्ही तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्याची संधी भाविकांना उपलब्ध (PMPML) होणार आहे.