आशिया खंडात द्वितीय तर जागतिक स्तरावर पटकावला सहावा क्रमांक
Team MyPuneCity –पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टने (Pimpri Chinchwad)आंतरराष्ट्रीय पातळीवर दर्जेदार व उच्च शैक्षणिक मूल्य जपत नावलौकिक प्राप्त केला आहे. (पीसीईटी) संचालित निगडी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) च्या टीम मेव्हरिक इंडिया संघाने अमेरिकेत व्हॅन नुयस, कॅलिफोर्निया येथे चार ते सहा एप्रिल दरम्यान जागतिक स्तरावरील एअरोडिझाईन स्पर्धेत आशिया खंडात द्वितीय क्रमांक तर जागतिक स्तरावर सहावा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत जगभरातील सत्तरहून अधिक विद्यापीठांचे संघ सहभागी झाले होते.
टीम मेव्हरिक इंडियाने डिझाईन रिपोर्ट विभागात सर्वाधिक गुण मिळवत जगात दुसरे स्थान पटकावले. तसेच मिशन परफॉर्मन्स मध्ये सहावा क्रमांक मिळवून भारतीयांच्या शैक्षणिक, अभियांत्रिकी कौशल्याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेतले आहे. या संघामध्ये द्वैपायन धर (संघ कर्णधार), तन्मय राजपूत, रोहित तांबडे, महेश्वर ढोणे, भूमिका शेखावत, अंशुल शेळके, विशालराजू लागुडुवा, मृदुला लेले, निष्ठा देसाई, हर्षवर्धन करंजे यांचा समावेश होता. तर पीसीसीओईचे संचालक डॉ गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ निलकंठ चोपडे, मेकॅनिकल विभागाचे प्रमुख – डॉ.पी.आर.काळे, इएनटीसीचे प्रमुख – डॉ. किशोर किनगे, एएस ॲण्ड एच प्रमुख – डॉ. लीना शर्मा, एसडीडब्लूचे सहयोगी अधिष्ठाता – डॉ. राहुल पाटील, एसडीडब्लूचे अधिष्ठाता – डॉ. पी.ए. देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
Sunil Shelke: परंदवडी येथे दलितवस्तीमध्ये समाजमंदिराचे बांधकाम पूर्ण;आमदार सुनील शेळके यांच्या स्थानिक विकास निधीतून झाला प्रकल्प

पाच वर्षांपूर्वी मेव्हरिक इंडियाची सुरुवात उपलब्ध संसाधनातून झाली. प्रारंभी काही प्रयोग असफल झाले. मात्र त्यांनी हार न मानता प्रयत्नपूर्वक आणि अपयशातून अनुभवातून शिकत नवीन आधुनिकता शिकत स्वतःला सक्षम केले. भरपूर मेहनत, चिकाटी, तांत्रिक कल्पकतेच्या बळावर या टीमने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केले आहे, अशी भावना पीसीईटी विश्वस्त मंडळाने व्यक्त केली.
Pune News : पुणे जिल्हा मुस्लिम शिकलगार समाज सेवा संघाकडून काश्मीरमधील भ्याड हल्ल्याचा निषेध
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी टीम मेव्हरिक इंडियाचे विद्यार्थी, मार्गदर्शक प्रा. चंदन इंगोले यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.