Team MyPuneCity – महाराष्ट्र दिनाच्या (१ मे)(Pimpri Chinchwad) पार्श्वभूमीवर राज्यातील ८०० पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील तीन अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, विठ्ठल साळुंखे, सुहास आव्हाड यांना महासंचालक पदक जाहीर झाले आहे. पोलीस हवालदार विकास राठोड आणि नितीन ढोरजे यांना देखील हे पदक जाहीर झाले आहे.
महाराष्ट्र पोलीस दलामध्ये विविध प्रकारच्या प्रवर्गात केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि राष्ट्रपती यांचे गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक, शौर्य पदक प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह दिले जाते. यावर्षी १८० अधिकारी आणि ६२० कर्मचाऱ्यांना हे पदक जाहीर करण्यात आले आहे. पदक जाहीर झालेल्या पोलिसांचे पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांनी अभिनंदन केले आहे.
Pimpri News : दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यास मोदी सक्षम – रामदास आठवले