situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 31 March 2025 : चिंचवड येथे शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

Published On:
Crime 1
---Advertisement---

Team MyPuneCity – शस्त्र बाळगल्या प्रकरणी चिंचवड मधील मोरया नगर झोपडपट्टी येथून एका तरुणाला अटक करण्यात आली. ही कारवाई रविवारी (दि. 30) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास (Pimpri Chinchwad Crime News 31 March 2025)  केली.

सलीम उर्फ सल्या मोहम्मद बागवान (वय 23, चिंचवडे नगर, चिंचवड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अंमलदार देवा राऊत यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरया नगर झोपडपट्टी चिंचवड येथे एक तरुण कोयता घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सलीम याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 300 रुपये किमतीचा कोयता जप्त करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

——

All India Brahmin Pune Federation : अखिल भारतीय ब्राह्मण पुणे महासंघाने प्रतिकूल परिस्थिती असणाऱ्या मुलींना मदत करत उभारली माणुसकीची गुढी

भोसरी येथे कंटेनरची दुचाकीला धडक, दोघे जखमी ( Pimpri Chinchwad Crime News 31 March 2025) 

गोडाऊन चौक मोशी येथे एका कंटेनरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी वरील पती-पत्नी जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी (दि. 29) रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास घडला.

महादेव विश्वनाथ गरड (वय 45, रा. चऱ्होली बुद्रुक) आणि त्यांची पत्नी सुजाता महादेव गरड (वय 37) अशी जखमींची नावे आहेत. महादेव गरड यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनर (एमएच 44/यु 5197) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महादेव गरड आणि त्यांच्या पत्नी सुजाता गरड त्यांच्या दुचाकीवरून कामावरून घरी जात होते. भोसरी येथून मोशीकडे जात असताना गोडाऊन चौक मोशी येथे आरोपी कंटेनर चालकाने त्याच्या ताब्यातील कंटेनर सिग्नल तोडून हयगयीने चालवला. कंटेनरने गरड यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये महादेव गरड आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. तसेच त्यांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

———-

चाकण  येथे कार चालकाने दुचाकी वरील दोघांना नेले फरफटत ( Pimpri Chinchwad Crime News 31 March 2025) 

पुणे-नाशिक महामार्गावर खेड तालुक्यातील खुंबरेनगर येथे एका कार चालकाने दुचाकीला धडक दिली. दुचाकी वरील दोघांना कार चालकाने काही अंतर फरफटत नेले. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि. 30) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली.

निलेश दत्तात्रय पाटेकर (वय 22, रा. वाकी, खेड), नागेंद्र रामचंद्र प्रजापति (वय 21) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी निलेश यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार (एमएच 14/जेएच 4783) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निलेश पाटेकर आणि त्यांचा मित्र नागेंद्र प्रजापती हे दुचाकीवरून कामावर जात होते. पुणे-नाशिक महामार्गावरून जात असताना खुंबरेनगर येथे त्यांच्या दुचाकीला कारने धडक दिली. धडक दिल्यानंतर कार चालकाने निलेश आणि त्यांचा मित्र नागेंद्र दोघांनाही फरफटत नेले. त्यानंतर कारचालक पळून गेला. या अपघातात निलेश आणि त्यांचा मित्र नागेंद्र दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Fire News: लोणावळा येथील तुंगार्ली गावात एका बंगल्यात आग

———

पिंपरी येथे किरकोळ वादातून लहान भावाला मारहाण ( Pimpri Chinchwad Crime News 31 March 2025) 

किरकोळ वादातून 64 वर्षीय मोठ्या भावाने 58 वर्षीय लहान भावाला हेल्मेटने मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 30) सकाळी 11 वाजताच्या सुमारास संत तुकाराम नगर पिंपरी येथे घडली.

सुरेश चांगु पारंगे (वय 58, रा. संत तुकाराम नगर पिंपरी) असे मारहाण झालेल्या भावाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रदीप चांगु पारंगे (वय 64, रा. संत तुकाराम नगर पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप पारंगे याच्या घराच्या दरवाज्याच्या कडीला कुलूप लावून ठेवले होते. दरवाजा उघडा होता. या कारणावरून प्रदीप याने सुरेश यांना तू घराला कुलूप का लावले असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच हेल्मेटने सुरेश यांच्या डोक्यात मारून त्यांना दुखापत केली. पोलिसांनी प्रदीप पारंगे यास अटक केली आहे. संत तुकाराम नगर पोलीस तपास करीत आहेत.

——–

महाळुंगे येथे पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीचे आत्महत्या ( Pimpri Chinchwad Crime News 31 March 2025) 

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 25 मार्च रोजी खेड तालुक्यातील आंबेठाण येथे घडली.

आत्महत्या केलेल्या 23 वर्षीय महिलेचे वडील भगवान सखाराम खंदारे (वय 56, रा. यवतमाळ) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती प्रशांत संजय धोंगडे (रा. आंबेठाण पुणे. मूळ रा. यवतमाळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2023 मध्ये फिर्यादी यांची मुलगी आणि आरोपी प्रशांत यांचा विवाह झाला. विवाहानंतर सहा महिन्यांनी प्रशांत याने पत्नीच्या चरित्रावर संशय घेऊन तिला शिवीगाळ करत त्रास दिला. वारंवार घर खर्चासाठी आणि शिक्षणासाठी पैशांची मागणी केली. पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. 25 मार्च रोजी महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Follow Us On