प्रकल्प पूर्ण रद्द होईपर्यंत (Pavana Pipeline) लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार
मावळ ऑनलाईन –पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात ९ ऑगस्ट २०११ रोजी, (Pavana Pipeline) मावळ तालुक्यातील बऊर येथे पुणे- मुंबई एक्सप्रेस हायवेवर पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात आंदोलन करण्यात आले होते. या घटनेला ( दि.९) ऑगस्ट रोजी, १४ वर्षे पूर्ण झाली असून या आंदोलनामध्ये गोळीबार होऊन कांताबाई ठाकर, शामराव तुपे व मोरेश्वर साठे या तीन शेतकऱ्यांचा बळी गेला होता.
तर या शेतकऱ्यांना आज (शनिवारी) येळसे येथील स्मृती स्थळावर श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी बऊर येथून प्राणज्योत आणण्यात आली. व येळसे येथील स्मृतिस्थळावर १२ वाजून ४० मिनिटांनी श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे,(Pavana Pipeline) भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, आर पी आय अध्यक्ष लक्ष्मण भालेराव, बाळासाहेब घोटकुले, भाजपा मंडल अध्यक्ष दत्तात्रय माळी, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष गणेश ठाकर, पवन फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकुंद ठाकर, ज्ञानेश्वर ठाकर, माजी सरपंच अशोक राजिवडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप ढमाले, गुलाब वरघडे, यांच्या सह शेतकरी बांधव उपस्थित होते.


ज्ञानेश्वर दळवी
यावेळी बोलताना दळवी म्हणाले की, जर हा निम्मा मावळ तालुका आपल्याला सुरक्षित ठेवायचा असेल तर हा प्रकल्प कायमचा रद्द झाला पाहिजे. ही आमची मागणी शेवट पर्यंत राहणार आहे. आणि त्यासाठी जो काही लढा पुन्हा उभारावा लागला तरी तो आम्ही उभारणार आहे. जर बंदिस्त पाईप लाइन मधून पाणी नेले तर अनेक कुटुंब उध्वस्त होतील त्यामुळे शासनाने शांत डोक्याने विचार करून यावरती मार्ग काढावा व हा प्रकल्प लवकरात लवकर रद्द करावा ही आमच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे.
बाळा भेगडे ( माजी राज्यमंत्री)
बंदिस्त जलवाहिनी संदर्भात आमच्या शेतकऱ्यांची पहिल्या पासून जी भूमिका होती ती आज ही ठाम आहे. मावळ तालुक्यातील जनतेने जो निर्धार केला होता त्या माध्यमातून कुठलेही सरकार याबाबत पुढचा कोणताही निर्णय घेत नाही हे आमच्या मावळ तालुक्यातील आत्तापर्यंतच्या या आंदोलनाचे खऱ्या अर्थाने यश आहे.
Talegaon Dabhade: गोकुळाष्टमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन
बाळासाहेब घोटकुले
कुठल्याही परिस्थितीत बंदिस्त जलवाहिनीतून पाणी नेऊन देणार नाही. नैसर्गिक पद्धतीने जे पाणी जाते आहे त्याच पद्धतीने पाणी न्यावे. जर हा पाणी नेण्याचा कोणीही घाट घातला तर या पेक्षाही सर्वव्यापी आंदोलन उभे करू. व जरी सरकार कोणाचेही असले तरीही पाणी जाऊन देणार नाही.
गणेश भेगडे
पूर्वी या प्रकल्पाला शासनाने स्थिगिती दिली होती. मध्यंतरी ती स्थिगिती उठवली गेली या प्रकल्पाबाबत शासनाची जी धर-सोड वृत्ती आहे. परंतु शासनाचा काही जरी निर्णय असला तरी आम्ही मावळवासीयांचे या प्रकल्पाबाबत जे धोरण ठरवले आहे. जो पर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही तो पर्यंत आमचा लढा सुरू राहणार आहे.
काँग्रेसचा बंदिस्त जलवाहिनीला तीव्र विरोध..
मावळ तालुक्यामधील बंदिस्त जल वाहिनीच्या विरोधामध्ये गेल्या 14 वर्षापासून जे आंदोलन झाले होते आणि ही जलवाहिनी कायम स्वरुपी बंद व्हावी असा आमची मागणी होती. त्यावेळी आमचे आघाडीचे सरकार होते त्यावेळेस त्या सरकारने हा जो प्रकल्प होता त्याला स्थगिती दिली होती आणि ती स्थगिती आताच्या या महायुती सरकारने आता ती उठवली आहे ती कुठल्या स्वार्थापेटी उठवली काय माहित नाही परंतु सर्व सामान्य जनतेचा आणि आमचा या जलवाहिनीला पूर्णतः विरोध आहे आणि भविष्यातही राहील आणि सर्वपक्षीय एकत्र येऊन आम्ही ही जलवाहिनी होऊ देणार नाही. अशी माहिती काँग्रेसचे यशवंत मोहोळ यांनी दिली.