मावळ ऑनलाईन –पवना धरणातून बंद जलवाहिनी मार्गे( Pavana pipeline project) पाणी पिंपरी-चिंचवड शहराला पोहोचवण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मावळच्या शिवसैनिकांनी विरोध केला आहे.
Rashi Bhavishya 8 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
या प्रकल्पासाठी तब्बल १०८ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. तसेच पाईपलाइनसाठी मोठ्या प्रमाणात साहित्य मागवण्यात आले होते. मात्र मावळमधील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केल्याने विरोधामुळे प्रकल्प बंद पडला ( Pavana pipeline project)होता. यावेळी पोलिसांच्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांच्या मृत्यूची झाला होता.सध्या प्रकल्पाला पुन्हा गती देण्याच्या हालचाली सुरू आहेत, ज्यामुळे एकनाथ शिंदे गटातील शिवसैनिकांनी प्रकल्प पूर्णपणे रद्द करण्याची मागणी केली आहे आणि आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Rashi Bhavishya 8 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
मावळ तालुका शिवसेना प्रमुख राजू खंडभोर यांनी म्हटले, “शेतकऱ्यांना न्याय मिळे पर्यंत आम्ही आवाज उठवणार आहोत. प्रकल्पासाठी ( Pavana pipeline project) झालेले मृत्यू आणि इतर सर्व त्रास लक्षात घेता, हा प्रकल्प पूर्णपणे रद्द व्हायला हवा.” शिवसेना तालुका संघटक अमित कुंभार यांनीही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.