मावळ ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मावळ तालुक्यातील आंद्रा व पवना ( Pavana Dam ) या महत्त्वाच्या धरणांमध्ये पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. पवना धरण 77.80 तर आंद्रा 92.14 टक्के भरले.
Rashi Bhavishya 8 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
प्रशासनाने या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षितते संबंधी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
आंद्रा धरण (मावळ तालुका)
आंद्रा धरण सध्या 92.14% क्षमतेने भरले असून हे धरण द्वारविरहित (Ungated) असल्यामुळे भरले की सांडव्यावरून पाणी अनियंत्रितपणे आंद्रा नदीपात्रात सोडले जाऊ शकते.या नदीचा पुढे इंद्रायणी नदीशी संगम होत असल्याने इंद्रायणी नदीची पातळी वाढण्याची ( Pavana Dam )शक्यता आहे.
पवना धरण
धरणाची भरलेली टक्केवारी सकाळी 5 वाजेपर्यंत 77 टक्के होती. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे येवा वाढला असून त्यानुसार धरणातून 2800 क्युसेक्स वेगाने पाणी नदीपात्रात सोडले जात होते. मात्र सकाळी 6.30 वाजता विसर्ग वाढवून 3400 क्युसेक्स करण्यात आला आहे.
Charholi Budruk:युवराज शेलार यांचे आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा व विठुरायाचे लक्षवेधक चित्र
प्रशासनाने या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षितते संबंधी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
नागरिकांसाठी सूचना
धरणातील विसर्ग पावसाच्या येव्यानुसार कमी-जास्त होऊ शकतो, याची नोंद घ्यावी.कोणीही नदीपात्रात जाऊ नये.
पंप, शेती अवजारे, जनावरे तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावीत. सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला ( Pavana Dam ) आहे.