मावळ ऑनलाईन – पवना धरण परिसरात पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे धरणामधील पाणीसाठा नियोजनबद्ध पद्धतीने नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्गामध्ये काही ( Pavana Dam) प्रमाणात वाढ करण्यात येत आहे. पवना नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घेऊन सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आज (शनिवार) सकाळी 8 वाजता देण्यात आलेल्या ताज्या सूचनेनुसार, धरणाचा साठा 86.34 टक्क्यांवर पोहोचला असून, सांडव्यावरून 5940 क्युसेक्स विसर्ग सुरू ( Pavana Dam) आहे. हवामानाचा अंदाज लक्षात घेता, सकाळी 9 वाजेपर्यंत विसर्ग वाढवून 7410 क्युसेक्स केला जाण्याची शक्यता आहे. ही वाढ टप्प्याटप्प्याने आणि नियोजित स्वरूपात करण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.
शुक्रवारी (दि.25) रोजी संध्याकाळी 7.30 वाजता जाहीर करण्यात आलेल्या सूचनेनुसार, धरण 84.87 टक्के भरलेले होते. त्यावेळी सांडव्यावरून 1500 क्युसेक्स ( Pavana Dam) आणि जलविद्युत केंद्रातून 1000 क्युसेक्स असा एकूण 2500 क्युसेक्स विसर्ग सुरू होता. त्यानंतर रात्री 8 वाजता विसर्गाचे प्रमाण वाढवून एकूण 4400 क्युसेक्स करण्यात आले.
Alandi: वै. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर स्मारकाजवळील अतिक्रमण हटविणे बाबत आळंदी नगरपरिषदेस निवेदन
या पार्श्वभूमीवर, नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात न उतरणे, तसेच शेती उपकरणे, जनावरे व तत्सम साहित्य सुरक्षित स्थळी हलविणे गरजेचे आहे. सखल भागातील नागरिकांनीही आवश्यक ती खबरदारी घ्यावी. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही कृती पूर्वतयारीचा भाग असून, पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गाचे प्रमाण पुढे कमी अथवा वाढवले जाऊ शकते. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणांवर लक्ष ठेवावे, असेही प्रशासनाने ( Pavana Dam) स्पष्ट केले आहे.