मावळ ऑनलाईन –मावळ तालुक्यातील पवना धरण ७५.६९ टक्के भरले असून, पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची मोठी आवक होत आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी सांडव्याद्वारे नदीपात्रात नियंत्रित पद्धतीने ८०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. रविवारी (६ जुलै) दुपारी अडीच वाजता पाणलोट क्षेत्रातील येव्यानुसार सांडव्यावरील विसर्गात वाढ करून एकूण विसर्ग १६०० क्युसेक्स इतका केला जाणार आहे.
पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणीही नदीपात्रात उतरू नये असे आवाहन करण्यात आले आहे. नदीमधील पाण्याचे पंप, नदीकाठची शेती अवजारे आणि तत्सम साहित्य तसेच जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
Dehu:देहूत तुकोबांच्या दर्शनासाठी भर पावसात भाविकांची गर्दी
Alandi :देवशयनी आषाढी एकादशी निमित्त माऊली मंदिरात भाविकांची गर्दी
पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार आणि येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग कमी/जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सखल भागातील नागरिकांना सूचना देण्यात येत आहेत. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे.