मावळ ऑनलाईन – लोणावळा जवळ भुशी गावात कोंबड्यांच्या खुराड्यात भला मोठा अजगर आढळला. सर्पमित्रांनी त्याला सुरक्षितरीत्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. ही घटना शनिवारी (5 जुलै) पहाटे अडीच वाजताच्या सुमारास (Python) घडली.
Pavana Dam : पवना धरण 77.28 % भरले; नदीपात्रात 2600 क्युसेस विसर्ग सुरु
याबाबत माहिती अशी की, भुशी गावातील रहिवासी उमेश मराठे यांच्या घराच्या बाजूला असलेल्या कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये अजगर असल्याची माहिती सर्पमित्र सचिन मराठे यांना मिळाली. त्यानुसार सचिन मराठे, युवराज खोमणे, संजय मराठे, प्रथमेश मराठे, प्रणव मराठे, शेखर मराठे यांनी घटनास्थळी धाव (Python) घेतली.
ही घटना मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास उघडकीस आली होती. सर्पमित्रांनी अजगराला सुरक्षितरीत्या पकडले. अजगराने दोन कोंबड्या फस्त केल्या होत्या. तिसरी कोंबडी खात असताना त्याला पकडण्यात आले. रात्रभर सुरक्षित ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यास नैसर्गिक (Python) अधिवासात सोडण्यात आले.