मावळ ऑनलाईन – पवना धरण परिसरात मागील 24 तासांत जोरदार 33 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात लक्षणीय वाढ ( Pavana Dam ) झाली असून, सध्याचा जलसाठा 71.48 टक्क्यांवर पोहोचला आहे.
Kondhwa rape case : कोंढवा बलात्कार प्रकरणाला नवे वळण, पीडितेलाच घेतले पोलिसांनी ताब्यात
चालू वर्षात 1 जूनपासून आतापर्यंत एकूण 1 हजार 85 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, त्याचा सकारात्मक परिणाम धरणातील पाणी साठ्यावर झाला आहे. मागील 24 तासांत एकट्या साठ्यात 2.37टक्क्यांची वाढ झाली आहे. एकूणच 1 जूनपासून आजपर्यंत साठ्यात 51.67 टक्के वाढ ( Pavana Dam ) झाली आहे.
Pavananagar Accident : पवनानगरजवळ मालमोटार उलटली; चालक जखमी
पवना धरणात गतवर्षी याच दिवशी म्हणजेच 5 जुलै 2024 रोजी धरणाचा पाणी साठा केवळ 19.09 टक्के इतकाच होता. त्यामुळे यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीस पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक आहे.
हा वाढलेला साठा आगामी महिन्यांतील पाणीपुरवठ्यासाठी आश्वासक ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत ( Pavana Dam ) आहे.