मावळ ऑनलाईन — पवना नदीच्या काठावरील भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची सूचना जलसंपदा विभागाच्यावतीने जारी करण्यात ( Pavana Dam) आली आहे. पवना धरणात सध्या 81.23% पाणीसाठा झालेला असून पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग करण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तवली आहे.
PMPML : पीएमपीएमएलची पुणे लोणावळा मार्गावर पर्यटन बस सेवा
खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे यांच्या मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षामार्फत देण्यात आलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानुसार, धरणातून सुमारे 1600 क्युसेक्स वेगाने विसर्ग केला जाऊ शकतो. हवामान आणि पावसाच्या स्थितीनुसार विसर्गात वाढ अथवा घट होऊ ( Pavana Dam)शकते.
विशेषतः पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीपात्रात उतरणे, वाहने किंवा जनावरे नदीपात्रात ( Pavana Dam)नेणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच संबंधित स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सदर विसर्ग संभाव्य असला तरी तो हवामान व पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या स्थितीवर अवलंबून असेल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले ( Pavana Dam) आहे.