मावळ ऑनलाईन – मुसळधार पावसामुळे पवना धरण ( Pavana Dam) जलाशय सध्या 99.70% भरलेले आहे. परिणामी नदीपात्रात विसर्ग वाढविण्याचा निर्णय जलसंपदा विभागाकडून घेण्यात आला आहे. धरणाच्या पूरनियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार सध्या धरणातून एकूण 7 हजार 160 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामध्ये जलविद्युत केंद्राद्वारे 1 हजार 400 क्युसेक तर सांडव्याद्वारे 5 हजार 760 क्युसेक इतका विसर्ग होत आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम असल्याने येव्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्यासाठी आज मंगळवारी (दि. 19 ऑगस्ट) संध्याकाळी 6 वाजल्यापासून सांडव्याद्वारे होणाऱ्या विसर्गात वाढ करून तो 8 हजार 550 क्युसेक करण्यात येणार आहे. या वाढीनंतर एकूण विसर्ग 9 हजार 950 क्युसेक इतका( Pavana Dam) राहील.
Achyut Potdar : ज्येष्ठ मराठी अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन
याबाबत पूरनियंत्रण कक्षाने स्पष्ट केले आहे की, जर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला तर दुसऱ्या टप्प्यात विसर्ग आणखी वाढवून 12 हजार क्युसेकपर्यंत केला जाऊ शकतो. तसेच पावसाच्या तीव्रतेनुसार आणि धरणात होणाऱ्या येव्यानुसार विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी-जास्त केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले ( Pavana Dam) आहे.