मावळ ऑनलाईन – ॲड .पु.वा परांजपे विद्या मंदिरात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ( Paranjape Vidya Mandir) यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी दहावीचे वर्गशिक्षक संजय खराडे, आशा आवटे , अनिता नागपुरे यांनी वैविध्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दहावीतील विद्यार्थी शिक्षिका किरण काशीद ( Paranjape Vidya Mandir) हिने शिस्तबद्ध परिपाठ घेऊन.संगितमय योगासने व कवायत प्रकार घेतले. आजच्या कार्यक्रमाचे विद्यार्थी मुख्याध्यापक आदित्य दराडे तसेच पर्यवेक्षिका श्रावणी हेळकर यांनी या कार्यक्रमाची सूत्रे हाती घेऊन पहिल्या पाच तासिकांची शाळा उत्तम प्रकारे चालविली.शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांनी अध्यापनाची उत्तम तयारी करून वर्गा वर्गात जाऊन उत्तम प्रकारे शिकवले शिपाई झालेल्या विद्यार्थ्यांना शिपायांची कामे न लाजता चांगल्या प्रकारे केली शाळेतील दहावीचे विद्यार्थी यांनी शिक्षकांची भूमिका यशस्वीरित्या पार पाडून शाळेतील शिक्षकांना अध्यापनाच्या कामातून एक दिवस विश्रांती दिली बजावली .
Kalapini : नाट्यछटा स्पर्धेत कलापिनी कुमार भवनची मुले चमकली
विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून सर्वांनाच आनंद वाटला. दुपारच्या सुट्टीनंतर शिक्षक दिनाचा ( Paranjape Vidya Mandir) कार्यक्रम आयोजित करण्यात आला .कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमा डॉक्टर राधा कृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे उपक्रमशील सचिव ,संतोष खांडगे , प्रमुख पाहुणे विवेक गुरव, विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे , पर्यवेक्षिका ,रेखा भेगडे ,आजचे कार्यक्रमाचे विद्यार्थी मुख्याध्यापक आदित्य दराडे ,पर्यवेक्षिका श्रावणी हेळकर यांच्या शुभहस्ते झाले.
Pune: पुणे महापालिका निवडणूक प्रभाग रचनेवर तब्बल 5 हजार 843 हरकती, सोमवारपासून होणार सुनावणी
त्यानंतर दहवीतील विद्यार्थिनी गायलेल्या गुरुवंदनाने झाली . कार्यक्रमाचे ( Paranjape Vidya Mandir) अध्यक्ष संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी प्रमुख पाहुणे व्याख्याते विवेक गुरव यांचा सत्कार केला.नंतर पाचवी ते नववीतील काही विद्यार्थ्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच शिक्षकांचे गुणगौरव करणारी भाषणे केली. दहावीतील शिक्षक विद्यार्थ्यांनी वर्गात शिकविताना आलेले अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
त्यानंतर नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे उपक्रमशील सचिव संतोष खांडगे साहेब यांनी विद्यार्थ्यांना आई-वडील, गुरुजन ,ग्रंथ ,निसर्ग या प्रत्येकाकडून चांगले गुण घ्या ( Paranjape Vidya Mandir) असा मोलाचा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिला. विद्यालयातील ज्येष्ठ अध्यापिका आशा आवटे यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवन चरित्र कथन केले.
प्रमुख पाहुणे विवेक गुरव यांचा परिचय अनिता नागपुरे मॅडम यांनी करून दिला. गुरव सरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना आपले वक्तृत्व कसे असावे वक्ता कसा असावा याविषयीची मार्गदर्शन केले .
विद्यालयातील सुवर्णा काळ डोके यांनी शाळेच्या विकासाचा चढता आलेख कथन केला .यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ( Paranjape Vidya Mandir) करताना विद्यार्थ्यांना शिक्षकांचे आपल्या जीवनातील महत्व अधोरेखित करत भाषण केले .
तसेच शिक्षकांच्या योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना जागृत राहण्याचे आवाहन केले .दहावीच्या विद्यार्थ्याकडून सर्व शिक्षकांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे आभार दहावीतील कु.अंजली गराडे या विद्यार्थिनीने मानले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावीतील कुमारी श्रावणी हेळकर ,देवयानी दाभाडे या विद्यार्थिनींनी केले .हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यातParanjape Vidya Mandir) आला व कार्यक्रमाची सांगता झाली.