मावळ ऑनलाईन – नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, तळेगाव दाभाडे संचलित कै. अॅड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालय, तळेगाव दाभाडे येथील ( Nutan Maharashtra Mandal) एल. एल. बी. प्रथम वर्षाचे विद्यार्थी यांनी “कायद्याच्या अंमलबजावणी यंत्रणांची माहिती” या विषयावर आधारित शैक्षणिक उपक्रमाचा एक भाग म्हणून तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनला भेट दिली. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना कायद्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची समज देणे, गुन्हे नोंदणी व तपास प्रक्रिया जवळून पाहण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि न्यायव्यवस्थेतील पोलीस यंत्रणेची भूमिका प्रत्यक्ष अनुभवण्याचा होता.
या शैक्षणिक भेटीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण कांबळे ( Nutan Maharashtra Mandal) व पोलीस उपनिरीक्षक ए. के. मुल्ला यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांच्या आधारे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विविध गुन्हेगारी व कायदेशीर बाबींबाबत प्रश्न विचारून आपली शंका निरसन करून घेतली. पोलिस स्टेशनमधील विविध शाखा — गुन्हे शाखा, तक्रार नोंदणी कक्ष, तपास कक्ष यांची पाहणी करून विद्यार्थ्यांनी पोलिस प्रशासनाचे संघटन आणि कार्यपद्धती यांचे निरीक्षण केले.
Chandrika Pujari : चंद्रिकाच्या कामगिरीमुळे झोपडपट्टीतील मुलांना नवी प्रेरणा- राहुल डंबाळे
या प्रसंगी कै. अॅड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयाचे ( Nutan Maharashtra Mandal) प्राचार्य कैलास पौळ प्राध्यापक अनुप पाठक आणि सत्यजीत कांबळे (लेवी मॉर्निंगस्टार) उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अशा शैक्षणिक उपक्रमांमुळे व्यवहारिक ज्ञान मिळते आणि कायद्याच्या अध्ययनाची आवड अधिक दृढ होते, असे सांगितले.
Kothurd Crime News : कोथरूडमध्ये दहा लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण कांबळे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले, “एक सक्षम वकील होण्यासाठी केवळ पुस्तकातील ज्ञान पुरेसे नसते. ( Nutan Maharashtra Mandal) प्रत्यक्ष व्यवहारातील परिस्थिती, तपास प्रक्रिया आणि समाजातील कायद्याचा वापर समजून घेणे आवश्यक आहे. वाचनाची सवय, केस लॉ चा सखोल अभ्यास आणि नैतिकता यामुळेच विद्यार्थी उत्तम विधिज्ञ बनू शकतो.”
भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या दैनंदिन कामकाजाची माहिती घेतली. गुन्हा नोंदणी प्रक्रिया, प्राथमिक तपासाची पद्धत, ताबा प्रक्रिया, पंचनामा कसा घेतला जातो, तसेच पुरावे जपण्याची व सादर करण्याची पद्धत याविषयी सविस्तर माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
या भेटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कायद्याच्या अंमलबजावणी यंत्रणांचे वास्तव चित्र समजले. पोलीस व न्यायव्यवस्था यांच्यातील समन्वय, तसेच नागरिकांचे ( Nutan Maharashtra Mandal) अधिकार आणि जबाबदाऱ्या यांविषयी विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान प्राप्त झाले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला असून, भविष्यातील न्यायव्यवस्थेतील जबाबदार आणि जागरूक वकील म्हणून घडण्यासाठी एक महत्त्वाचे यशस्वी पाऊल ठरले आहे. त्याबद्दल कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. कैलास पौळ यांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण कांबळे साहेब व पोलीस उपनिरीक्षक ए. के. मुल्ला यांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय तथा बाळा भेगडे, उपाध्यक्ष नंदकुमार शेलार, सचिव, अध्यक्ष – कार्यकारी समिती विधी महाविद्यालय – संतोष खांडगे, खजिनदार राजेश म्हस्के, सहसचिव विनायक अभ्यंकर व सर्व संचालकांनी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक व विद्यार्थी यांचे कौतुक ( Nutan Maharashtra Mandal) केले .






















