मावळ ऑनलाईन – नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाने २२ सप्टेंबर २०२५ रोजी आकुर्डी येथील ग.दि. माडगुळकर नाट्यगृहात प्रथम ( Nutan Maharashtra Engineering )वर्ष बी.टेक.च्या विद्यार्थ्यांसाठी “नूतन अनुगम” हा कार्यक्रम भव्य पद्धतीने पार पाडला.
Sharadiya Navratra : खंडोबा चौकातील नवरात्रोत्सवात महिलांसाठी विविध कार्यक्रम
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन आणि गणेश वंदना झाली. स्वागत प्राचार्यांनी केले. त्यानंतर २०२४-२५ शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे डॉ. सचिन इटकर (उपाध्यक्ष, एमईडीसी) यांनी विद्यार्थ्यांना जगाच्या बदलत्या प्रवाहाबरोबर चालण्यासाठी स्वतःमधील क्षमता विकसीत करून फक्त नोकरीकडे न पाहता स्वतःचे उद्योग व स्टार्टअप्स निर्माण करण्याचे विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे ,असे ( Nutan Maharashtra Engineering ) सांगितले.
उद्योगपती डॉ. दीपक शिकारपूर यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानासोबत प्रभावी संवाद कौशल्य विकसित करणे, परदेशी भाषा शिकणे, टीमवर्क व सहकार्य, शिस्त व वेळेचे महत्त्व याविषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. विद्यासागर पंडित (माजी कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड) होते. विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना त्यांनी शिस्त, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण अभ्यासाचे महत्त्व लक्षात घेऊन सामाजिक जीवनाचे संतुलन राखण्याचे ( Nutan Maharashtra Engineering )आवाहन केले.
Case of Bribery : पुणे जिल्ह्यात लाच प्रकरणी तिन्ही महिला तलाठ्यांविरुद्ध कारवाई
यावेळी श्री. राजेश मस्के (खजिनदार आणि कार्यकारी समिती अध्यक्ष, एनएमव्हीपीएम) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. शितलकुमार रवंधळे (अध्यक्ष ऑल इंडिया टीपीओ असोसिएशन (एआयटीपीओए), डॉ. प्रमोद पाटील (डीन पुणे विद्यापीठ), श्री. नंदकुमार शेलार (सहसचिव), श्री. रामचंद्र जहागीरदार (सी.ई.ओ.), तसेच प्राचार्य डॉ. एस.एन. सपली उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रथम वर्षाचे अधिष्ठाता डॉ. शेखर रहाणे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. अर्चना येवले आणि प्रा. प्रतीक्षा तनपुरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समन्वयक डॉ. मिलिंद ओव्हाळ, विभागप्रमुख डॉ. आनंद दौलताबाद, प्रा. प्रेमकुमार कोल्ले आणि प्रथम वर्षाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने ( Nutan Maharashtra Engineering ) झाला.