मावळ ऑनलाईन – पुणे जिल्हा क्रीडा विभागाच्या (Nutan Maharashtra Engineering College) वतीने चिंचवड येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय शूटिंग स्पर्धेत तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
Metro Cable Theft : मेट्रोची केबल चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या प्रमुखास अटक
एअर रायफल (पिस्तूल १० मीटर) प्रकारात मुलांमध्ये अर्शद दिलावर याने दुसरा क्रमांक मिळवला. तर एअर रायफल (पिस्तूल १० मीटर) प्रकारात मुलींमध्ये मोक्षदा परमार हिने चौथा क्रमांक मिळवला. या यशामुळे या खेळाडूंची अंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली (Nutan Maharashtra Engineering College) आहे.
Kundamala News : कुंडमाता मंदिराला पुराचा धोका; इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ
संस्थेचे अध्यक्ष संजय उर्फ बाळा भेगडे, उपाध्यक्ष गणेश वसंतराव खांडगे, कॉलेजचे कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के, ससचिव नंदकुमार शेलार, संतोष खांडगे, सीईओ रामचंद्र जहागिरदार, प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख व राजेंद्र लांडगे क्रीडाशिक्षक यांचे मार्गदर्शन (Nutan Maharashtra Engineering College) लाभले.