मावळ ऑनलाईन – नूतन महाराष्ट्र् विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये ७९ वा स्वातंत्रदिन( Nutan Maharashtra Engineering College) उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी रॅपिड ७ या आस्थापनाचे इंडिया कंट्री मॅनेजर प्रसिद्ध उद्योजक स्वामी नाथन त्यांच्या पत्नी मीना शिवन प्रमुख अतीथी म्हणून उपस्थित होते. तसचे संस्थचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री, संजय ( बाळा) भेगडे, खजिनदार तसेच अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के , संस्थेचे सहखजिनदार नंदकुमार शेलार, पीसीईटी- एनएमआयईटी चे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट चे अधिष्ठाता डॉ.शितलकुमार रवंदळे, अभियांत्रिकीचे सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार, प्राचार्य डॉ. एस. एन. सपली आदी मान्यवर उपस्थित होते.
Independence day : तळेगाव शहरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा !
“स्वातंत्र्योत्तर काळतील परिस्थिती, हरितक्रांती नंतर झालेले ( Nutan Maharashtra Engineering College)आमूलाग्र बदल या वर दृष्टीक्षेप टाकता विद्यार्थ्यांनी आता मिळालेल्या यशामध्ये समाधानी न राहता अधिक प्रयत्नशील राहून प्रगती करावी. आत्ताच्या युगात देखील आर्टिफिशल इंटेलिजन्स सारख्या प्रगत प्रणालीचा वापर करून विद्यार्थ्यांनी पुढे गेले पाहिजे,” असे वक्तव्य मीना शिवण यांनी केले .
“आपला देशात उत्पादनावर प्रक्रिया करून त्या ( Nutan Maharashtra Engineering College)उत्पादनापासून वस्तू बनविनासाठी भर दिला पाहिजे आणि प्रत्येक वस्तू ही स्वतःच बनवली पाहिजे,” असा मानस स्वामी नाथन यांनी बोलताना व्यक्त केला.
” भारताची वाटचाल ही प्रगती पथाकडे जात असून भारत हा प्रगत राष्ट्राच्या यादी मध्ये जाण्यास मार्गस्त आहे याचा आनंद होत आहे,” असे प्रतिपादन भेगडे यांनी बोलताना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम प्रमुख डॉ. अर्चना येवले आणि देवदत्त दीक्षित या विद्यार्थ्याने केले. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन ( Nutan Maharashtra Engineering College) केले.