situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

NCP Maval : बबनराव भेगडे व त्यांचे सहकारी समर्थक राष्ट्रवादीतच

Published On:
NCP Maval

मावळ ऑनलाईन – मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पुणे पीपल्स को-ऑपरेटिव बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक बबनराव भेगडे( NCP Maval) आणि त्यांचे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच (अजित पवार गट) राहाणार असल्याचा निर्वाळा मावळ ऑनलाइनशी बोलताना भेगडे यांनी दिला.

Wagholi Lift Accident : वाघोलीत लिफ्ट कोसळली; सहा जण जखमी, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

बबनराव भेगडे हे सहकार क्षेत्राचे तज्ज्ञ असून त्यांनी आतापर्यंत तालुका आणि जिल्हास्तरावरील सहकार क्षेत्रात अनेक पदे भूषविली आणि कार्यरत राहिले ( NCP Maval)आहेत. देशाचे नेते शरद पवार यांनी स्थापन केलेल्या समाजवादी काँग्रेस (एस काँग्रेस) व राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाचे सदस्य म्हणून विविध पदांवर काम करत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नेते शरदराव पवार आणि अजित दादा पवार यांच्या विचारांशी ते एकनिष्ठ असून कट्टर समर्थक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच ते आणि त्यांचे सहकारी समर्थक सक्रिय राहणार आहेत. अन्य कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचेही भेगडे यांनी स्पष्ट केले.

Talegaon Cyber Fraud : कलाकाराच्या नावाने मदत मागत तळेगावात ज्येष्ठ नागरिकाचे व्हॉट्सअप खाते हॅक

विधानसभा निवडणुकीच्या वेळी काही गैरसमजामुळे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या( NCP Maval) काही नेत्यांमध्ये मतभेद झाले होते. त्यामुळे आपण पक्षाच्या कामापासून दूर राहिलो मात्र पक्ष सोडला नव्हता; मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच असून त्याच पक्षात काम करत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मी आणि माझे अनेक सहकारी समर्थक यांचाही हाच विचार असून आम्ही सर्वजण ( NCP Maval)याबाबत पक्षाचे प्रमुख अजित दादा पवार यांच्याशी बोलून आम्ही आपल्याबरोबरच आहोत, अशी हमी पुणे येथे प्रत्यक्ष भेटीत दिलेली असून, मी आणि माझे समर्थक कुठल्याही दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले.

शनिवारी (दि.१३) अजित दादा पवार यांनी आम्हा सर्वांना पुणे येथील पक्ष ( NCP Maval)कार्यालयात बोलावून सविस्तर चर्चा केली. मागील मतभेद आणि गैरसमज दूर करण्यात आले. आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांची पक्ष बांधणीसाठी गरज आहे आणि आतापर्यंत दिलेले पक्षासाठी योगदान महत्त्वाचे असून संघटनात्मक कामही केलेले आहे. त्यामुळे पक्षासाठी आपले योगदान द्यावे, असे अजित पवार यांनी नमूद केले.

त्यामुळेच मी आणि माझे २०० समर्थक व सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला असून, इथून पुढे पक्ष संघटना जे पद व काम देतील ते पद व काम त्याची निष्ठा आम्ही स्वीकारणार आहोत.मागील काळात पक्षाकडून केलेले सहा पदाधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेतले असून एकजुटीने काम करावे ,( NCP Maval)असे अजित पवार यांनी सांगितले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोक घारे बबनराव भोंगाडे, उपसभापती नामदेव शेलार, पीएमआरडीए सदस्य संतोष भेगडे, खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष अंकुश आंबेकर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सुनील दाभाडे, माजी सरपंच ज्ञानेश्वर मराठे, चंद्रकांत दहिभाते, बाळासाहेब भदे, लहू सावळे, रवींद्र घारे, आयुब सिकिलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ॲड साहेबराव टकले, शंकर वाजे,ॲड ज्ञानेश्वर दाभोळे, रघुनाथ मालपोटे, नगरसेवक अभिजीत काळोखे, प्रवीण काळोखे, जयेश मोरे, नवनाथ मालपोटे, विशाल मराठे, तानाजी दाभाडे, विठ्ठल जाधव, शरद भोंगाडे,राहुल पारगे, माजी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रूपाली दाभाडे यांच्यासह महिला पदाधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने ( NCP Maval) उपस्थित होते.

Follow Us On