मावळ ऑनलाईन – आखिल भारतीय नाट्य परिषद, तळेगाव शाखेच्या ( Natya Parishad)अंतर्गत नव्याने सुरु झालेल्या नाट्य परिषद महिला मंचाचा पहिला कार्यक्रम मंगळवार, २२ जुलै २०२५ रोजी उत्साहात पार पडला. या उपक्रमाची सुरूवात डॉ. अपर्णा महाजन यांच्या वाचिक सादरीकरणाने झाली.
Lokmanya Tilak Award : लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नितीन गडकरींना जाहीर, पुण्यतिथीदिनी वितरण
ब्रिटिश चित्रकार आणि लेखक चार्ली मॅकेसी यांच्या ‘A boy, a mole, a fox and a horse’ या संवेदनशील आणि विचारप्रवर्तक चित्रकथेचे सादरीकरण त्यांनी चित्रफितीच्या सहाय्याने केले. कार्यक्रमात कथेमधील जीवनमूल्ये, नातेसंबंध आणि आशावाद यांचा प्रत्ययकारक ( Natya Parishad)वेध घेतला गेला.

या कार्यक्रमाला आखिल भारतीय नाट्य परिषद तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, इतर पदाधिकारी तसेच तळेगावातील अनेक मान्यवर आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला मंचाच्या कार्यकारिणीमध्ये प्रमुख डॉ. अपर्णा महाजन यांच्यासोबत शर्मिला शहा, शुभांगी कारले, नयना डोळस आणि राधा गोहाड यांचा समावेश असून, या सर्वांनी कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस शर्मिला शहा यांनी प्रास्ताविक करत ( Natya Parishad)मंचाच्या संकल्पनेची ओळख करून दिली. त्यांनी सांगितले की दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी दुपारी ४ ते ६ या वेळेत महिला मंचाचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातील.
राधा गोहाड यांनी मंचाबद्दलचे निवेदन सादर करून अधिकाधिक महिलांनी सदस्यत्व घेऊन या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी पुढील महिन्यात डॉ. गीताली वी. मं यांचे व्याख्यान होणार असल्याची माहिती दिली.
कार्यक्रमानंतर झालेल्या अनौपचारिक चर्चेत प्रेक्षकांनी कथेतून मिळालेली सकारात्मकता आणि जीवनमूल्यांचा अनुभव शेअर केला. या चर्चेमुळे उपस्थितांमध्ये भावनिक ( Natya Parishad)आणि वैचारिक संपर्क तयार झाला.
नयना डोळस यांनी महिलांसाठी एक नाटक आणि एक बालनाट्य दिग्दर्शित करण्याची घोषणा केली. यासाठी इच्छुक महिला आणि बालनाट्यात सहभागी होऊ इच्छिणारी मुले ( Natya Parishad) यांनी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदुर महाजन यांनी केले.