Team MyPuneCity – मुळशी तालुक्यातील उरवडे येथे असलेल्या प्राज मॅट्रिक्स कंपनीच्या परिसरात शुक्रवारी रात्री भीषण आग (Mulshi Fire) लागल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
शुक्रवारी रात्री सुमारे ८.४५ वाजता या आगीची माहिती मिळताच पुणे मेट्रोपॉलिटन रीजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (PMRDA) अग्निशमन दल आणि पिरंगुट MIDC अग्निशमन दलाच्या तुकड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.
पुणे ग्रामीण पोलिस आणि स्थानिक रुग्णवाहिका सेवा देखील तातडीने सक्रिय करण्यात आली. PMRDA अग्निशमन विभागाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले की, आग आटोक्यात (Mulshi Fire) आणण्यासाठी PMRDAच्या चार आणि पिरंगुट MIDCच्या दोन अग्निशमन बंबांचा वापर करण्यात आला.
PMRDA अग्निशमन अधिकारी विजय महाजन यांनी सांगितले की, ही आग एका तासाच्या प्रयत्नानंतर (Mulshi Fire) नियंत्रणात आणण्यात यश आले असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे स्पष्ट केले.
या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिक तपास सुरू असून कंपनीच्या परिसरात सुरक्षा उपाय अधिक कडक करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
Talegaon : तळेगाव एमआयडीसमधील कंपन्यांसाठी सुरक्षा प्रशिक्षण व सुरक्षा स्पर्धा संपन्न