Team MyPuneCity – बोराडेवाडी, मोशी येथील १२ मजली इमारतीमध्ये (Moshi Fire News) आज सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ही आग इमारतीच्या आठव्या मजल्यावरील डक्टमधून गेलेल्या इलेक्ट्रिक वायरला लागल्याचे समजते.
आग लागल्यानंतर इमारतीत धुराचे लोट पसरले आणि काही नागरिक अडकले. घटनास्थळी तात्काळ पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले. त्यांनी वेळेवर हस्तक्षेप करून इमारतीत अडकलेल्या पाच ते सहा जणांची सुरक्षितपणे सुटका (Moshi Fire News) केली.
अग्निशामक दलाने काही वेळातच आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. आग नेमकी कशामुळे लागली याची चौकशी सुरू असून, प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किट ही कारणीभूत (Moshi Fire News) असू शकते.