मावळ ऑनलाईन – तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ( Missing) नवलाख उंबरे येथील एक महिला मागील एक महिन्यापासून बेपत्ता आहे. अद्याप महिलेचा शोध लागला नसल्याने महिलेबाबत माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी केले आहे.
मनिषा रमेश शेलार (49, नवलाख उंबरे, मावळ) असे बेपत्ता महिलेचे नाव आहे. याबाबत मनिषा यांच्या मुलाने पोलिसात तक्रार दिली आहे.( Missing) मनिषा रमेश शेलार (49, नवलाख उंबरे, मावळ) असे बेपत्ता महिलेचे नाव आहे. याबाबत मनिषा यांच्या मुलाने पोलिसात तक्रार दिली आहे.
Ganesh Festival : गणेशोत्सवावरील वेळेची बंधने शिथिल होण्यासाठी न्यायालयात बाजू मांडू – अजित पवार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषा शेलार 1 जुलै रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास राहत्या घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेल्याचा संशय आहे. त्यांचा परिसरात, नातेवाईकांकडे शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत. केस काळे पांढरे, उंची पाच फूट, कपाळावर गोंदलेले आहे. वरील वर्णनाच्या महिलेबाबत माहिती मिळाल्यास तळेगाव एमआयडीसी पोलिसांशी संपर्क ( Missing) करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.