मावळ ऑनलाईन –बेकायदेशीरपणे बाळगलेले पिस्तूल बघताना अचानक ट्रिगर दाबला(Mindewadi Crime News ) जाऊन गोळीबार झाला. यामध्ये एक जण जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी (13 सप्टेंबर) रात्री साडेसात वाजता कला डिफेन्स कंपनी येथुन इमर्सन कंपनी रोडवर मिंढेवाडी गावात घडली.
विजय कुमार (वय 28, सध्या रा. मिंढेवाडी, ता. मावळ. मुळ रा चकीया, जिल्हा मोहिहरी, राज्य बिहार), मंजरिन रजिफ मिया (वय 24, सध्या रा. मिंढेवाडी, ता. मावळ. मुळ रा नरकटीया, ता. ढरपा, जि मोहिहरी राज्य बिहार) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस हवालदार शंकर पाटील यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Warangwadi News : छाया नखाते यांचे निधन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कला डिफेन्स कंपनी येथुन इमर्सन कंपनी रोडने रुमकडे मोबाईल वरती बोलत घरी जात असताना विजयकुमार आणि मंजरिन हे त्यांच्याकडे असलेले बेकायदेशीर पिस्तूल पाहत होते. ट्रिगर मध्ये बोट घालून पिस्तूल गोल फिरवत असताना अचानक ट्रिगर दाबला गेला आणि यामध्ये गोळीबार झाला. या घटनेत विजयकुमार याच्या हाताला गोळी लागली आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विजयकुमार आणि मंजरिन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव तपास करीत आहेत.